पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६४ अंतरिक्षांतील चमत्कार. कित्येक युगें लोटलीं पाहिजेत ! परंतु, एक वेळ ही स्थिति सूर्यमालेचा नियंता व स्वामी जो प्रचंड सूर्य त्यास प्राप्त व्हाव- याची आहे, ही गोष्ट निर्विवाद आहे. सूर्य आपणांस दररोज पूर्वेकडून पश्चिमेकडे जातांना दृष्टीस पडतो. परंतु, ही त्याची खरी गति नव्हे; ही केवळ भासमान गति होय. कारण, पृथ्वी आपले आंसाभोंवतीं २४ तासांत एकदां पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, आणि त्यामुळें सूर्य पूर्वे- कडून पश्चिमेकडे जातोसा आपणांस दिसतो. त्याचप्रमाणे दर वर्षी राशिचक्रांतून सूर्याचा एक फेरा पुरा होतांना दिसतो. परंतु, सूर्याची ही वार्षिक गति देखील खरी नव्हे. कां कीं, पृथ्वी सूर्याभोवती फिरते, आणि त्यामुळे सूर्य राशिचक्रांतून जातोसा आपणांस वाटतो. सूर्याच्या ह्या दोन गति खोट्या, भासमान, भ्रांतिमूलक आहेत. असे जरी आहे, तरी सूर्य अगदींच स्थिर आहे असेंहि नाहीं. तो आपले आंसाभोंवतीं सुमारें २६ दिवसांत एक फेरा करितो हें पूर्वी सांगितले आहे. ही सूर्याची खरी गति होय. याशिवाय, सूर्य हा ग्रह वगैरे आपल्या सर्व मालेचें लटांबर बरोबर घेऊन शौरिनामक ( हरक्युलिस ) तारापुंजाकडे दर वर्षी ४०/५० कोटि मैल या गतीनें जात आहे ! तेव्हां, स्वतःभोवती फिरण्याची एक, आणि शौरि तारकापुंजाकडे जाण्याची एक, अशा दोन खऱ्या गति सूर्यास आहेत. आतां, सूर्यापासून आपणांस कोणता लाभ होतो व काय