पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/२२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उपसंहार. २४७ सूर्याची व त्याच्या प्रचंड मालेची योग्यता इतकीच, तेथें आपल्या एवढ्याशा चिमुकल्या गोलाची काय कथा ! या अशा चिमुकल्या गोलाच्या पापुद्र्यासारख्या पृष्ठभागा- वर १५० कोटि मनुष्यप्राण्यांचा सर्व जीवितव्यापार. आपण मोठे बुद्धिवान् असा यांना मोठा गर्व. पण यांची रिकामी बडबड मात्र पाहून घ्यावी. आपण कोठून येतों व आपणांस कोठें जावयाचें आहे हें ह्या बिचायांस समजतें का? कसें तरी उदरभरण करून आयुष्याचे दिवस हे कंठीत असतात. गुण्या- गोविंदानें राहून सुखांत काल घालवावा तें न करितां उलट हजारों शारीरिक व मानसिक अरिष्टें एकमेकांवर ओढून आणतात; आणि सतत विपत्तिजालांत आपणांस गुंतवून घेता- त ! या लोकांची समाजरचना तरी किती चमत्कारिक ? यांच्या निरनिराळ्या अनेक जाती व यांचे अनेक राजे. ह्यांच्यांत कलह कधीं नाहीं असें तर नसतेंच. यांच्यामध्यें क्षुल्लक गोष्टी- करितां देखील अनेकवेळां रणें माजून राहतात. प्रजेचे पालनकर्ते ह्मणविणारे राजे गरीब रयतेच्या निढळानें मिळविलेल्या पैशावर नेहमीं चैन भोगीत असतात. आणि या राजांचीं वारुळांसारखीं राज्य कायम ठेवण्यासाठीं ह्मणून दर शतकांत चार कोटि माणसें लढायांत मारिली जातात! ह्या गोष्टींचा विचार केला ह्मणजे बहुतेक सर्व लोक किती गाढ अज्ञानांधकारांत बुडून गेले आहेत हे पाहून मति चकित होते. अनंत विश्वांत आपल्या