पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/२२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४६ अंतरिक्षांतील चमत्कार. पृथ्वीवर एवढी जरी सुधारणा झाली आहे, इतकीं जरी यंत्रें निघालीं आहेत, आणि इतकें जरी ज्ञान वाढले आहे, तरी देखील एकंदर विश्वाचा कितवा भाग आपणांस दिसतो किंवा अदृष्ट विश्व दृष्ट विश्वापेक्षां कितीपट मोठें आहे याची कल्प- नाहि करणें मनुष्यशक्तीच्या बाहेर आहे असे ह्मणावें लागतें. पण इतकें मात्र खचीत आहे कीं, अदृष्ट विश्व दृष्ट विश्वापेक्षां • अनंतपट मोठे आहे. या सर्व विवेचनाचें सार काय निघतें तें पहा. सूर्यमाला आपल्या पृथ्वीपेक्षां अनंतपट मोठी! आकाशगंगा सूर्य- मालेपेक्षां अनंतपट मोठी! जें विश्व आपण पाहतों तें दृष्ट विश्व आकाशगंगेपेक्षां अनंतपट मोठें ! आणि जें विश्व आपणांस दिसत नाहीं तें अदृष्ट विश्व दृष्ट विश्वापेक्षां अनंतपट मोठें ! या भूतलावरील वस्तूंशीं तोलून पहातां आपली पृथ्वी मोठी विस्तीर्ण खरी. तसेंच या पृथ्वीवरहि असे अनंत गूढ चमत्कार आहेत, की ते पाहून मनुष्याची कल्पना कांहींच चालत नाहीं. पण हीच आपली 'बहुरत्ना वसुंधरा' एकंदर विश्वापुढे अगदींच कःपदार्थ आहे. अफाट महासागराच्या किनाऱ्यावरील वाळवंटांतला एखादा कण जर नाहींसा झाला तर तें जसें कोणास कधींहि उमगणार नाहीं, तद्वत् विश्वां- तून आपली सूर्यमालेचीमाला जरी नाहींशी झाली तरी सुद्धां काहींएक समजण्यांत येणार नाहीं. ज्या ठिकाणी प्रचंड