पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/२२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उपसंहार. २४५ - प्रदेशांत तारे, तारागुच्छ, धूमपुंज, इत्यादि जड पदार्थांची गढ़ीं आहेच ! अशी जर वस्तुस्थिति आहे, असा जर आपला प्रत्यक्ष अनुभव आहे, तर आजवर समजून आलेलें जें अंतरिक्ष तेवढेंच काय तें विश्व, आणि पलीकडे सर्व शून्य – असे मानणें हा केवढा वेडेपणा होईल ? ज्याची मर्यादा – मानवी- कल्पनेनें कां होईना–ठरवितां येईल, तें विश्व अनंत कसचें ? आणि तें कितीहि अद्भुत असले तरी त्याचा इतका चमत्कार तो कसचा ? दुर्बिणींतून मानवी दृष्टि वाटेल तेथवर जाऊं द्या, तेथून 'पलीकडे' हें आहेच ! फोटो- ग्राफच्या योगानें वाटेल तेथले तारे समजून येऊं द्या, तेथून 'पलीकडे' हें संपत नाहींच ! त्यास अंतच नाहीं. समजा कीं एक मोठा विस्तीर्ण गोल कल्पिला- एवढा विस्तीर्ण की त्याच्या पोटांत सूर्य, सूर्यमाला, आकाशगंगा, तारे, तारापुंज, धूमपुंज, इतकेंच नव्हे तर मनुष्याच्यानें कल्पना करव- तील तितके सारे जड पदार्थ, हीं सर्व प्रकरणें मावतील तरी देखील अनंत विश्वापुढें असला विस्तीर्ण भव्य गोल सिंधूत बिंदूप्रमाणें तरी शोभेल काय ? यावरून हे उघड आहे कीं, जें अंतरिक्ष आपणांस समजून आले आहे तें दृष्ट विश्व त्यांच्या पलीकडे असणाऱ्या अदृष्ट विश्वापुढें किती अल्प, आणि मानवी बुद्धिच काय पण मानवी कल्पनाशक्ति सुद्धां किती पंगु ! आज