पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/२२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४४ अंतरिक्षांतील चमत्कार. दुर्बिणींतून आपण पाहूं लागतों, तेव्हां आपली दृष्टि किती- पट वाढली जाते आणि विश्वाचा आणखी कितीपट विस्तार आपणांस दृष्टिगोचर होतो, याची कल्पना कशी व्हावी ? आणि त्यांतून जेव्हां मोठमोठ्या दुर्बिणींतूनहि न दिसणारे तारे आपणांस फोटोग्राफाच्या योगें कळून येतात, तेव्हां तर विश्वविस्ताराच्या मर्यादेविषयीं कल्पनाशक्तीची गतिच कुंठित होते. मोठमोठ्या दुर्बिणींतून जेथवर आपली दृष्टि जाते किंवा ज्या ताऱ्यांचे अस्तित्व आपणांस फोटोग्राफाचे योगानें मात्र कळून येतें, ते तारे जेथवर विश्वविवरांत पसरले आहेत तेथ वरच का विश्वाचा विस्तार आहे, आणि पलीकडे कांहींएक नाहीं ! एवढीच का विश्वमर्यादा ? यांतच का तारे, तारापुंज, इत्यादि चमत्कार भरले आहेत? आणि त्याच्या पलीकडे कांहींच नाहीं ? खरोखर पहातां आतांपर्यंत जें आपण पाहिलें त्यावरून तर वरील कल्पनेस मुळींच आधार नाहीं, आणि असें असेल असें आपलें मनहि घेत नाहीं. दुर्बिणीत जरा किंचित् सुधारणा झाली, किंवा फोटोग्राफच्या कांचेची प्रतिमा उठविण्याची शक्ति अंमळ वाढली गेली, की विश्वाची मर्यादा विस्तृत होऊन अधिक भाग दृष्टीस पडूं लागतो, आणि पूर्वी माहीत कहते असे असंख्य जड पदार्थ समजून येतात ! विश्वाच्या नवीन ज्ञात झालेल्या