पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/२२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उपसंहार. २४३ कल्पनातरंगांत क्षणभर रंगून जाण्यास तत्ववेत्त्यांच्याहि मनास आवडतें. यावरून सुज्ञ वाचकांचे लक्षांत सहज येईल कीं, ज्योतिषशास्त्राचा विषय 'परम रुक्ष व निवळ नीरस' अशी जी लोकांची साधारण समजूत झाली आहे ती यथार्थ नाहीं. ज्यानें अंतरिक्षस्थ चमत्कारांविषयी थोडेंसें तरी वाचलें असेल, तो सुद्धां कबूल करील कीं, चित्तास चमत्कृति भासविण्यांत, मनाचें रंजन करण्यांत, आणि अंतःकरणवृत्ति प्रसन्न करून टाकण्यांत ज्योतिषशास्त्राची योग्यता थोर कवींच्या रमणीय कवितेपेक्षा कमी नाहीं. विश्वामध्ये आपणांस जे पदार्थ जवळ आहेत अशा सूर्य- मालेतील जड पदार्थांपासून तों दृष्ट विश्वाच्या शेवटच्या कांठावर दिसणारे तारापुंज आणि धूमपुंज येथपर्यंत आपण क्रमाक्रमानें मजल मारली. या वरील वाक्यांत 'दृष्ट' शब्द आह्मीं मुद्दाम ठळक अक्षरांनी लिहिला आहे. कारण मोठमो- ठ्या दुर्बिणींच्या साह्यानें जेथवर आपली मानवी दृष्टि जाऊं शकते, तो सर्व भाग सुद्धां एकंदर विश्वाच्या अनंत विस्तारा- पुढे अगदींच अल्प आहे, हें जें ज्योतिषशास्त्राचें परम रहस्य तें वाचकांच्या लक्षांत पूर्णपणे बिंबलें जावें. एरवीं नुसत्या डोळ्यांनीं विश्वाचा जो भाग आपण बघतों तोच अगोदर किती मोठा आहे हे समजत नाहीं. मग जेव्हां मोठमोठ्या शक्तींच्या