पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/२२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४२ अंतरिक्षांतील चमत्कार. लहान, कांहीं सहस्रपट-लक्षावधिपट-मोठे गोल आहेत, यांवर प्रचंड पर्वत, विस्तीर्ण अरण्यें, अफाट महासागर, मोठमोठ्या नद्या, सुंदर बेटे, रम्य सरोवरें हीं असावयाचींच ! पाणी आणि जमीन हीं असलीं कीं वनस्पति, पशु, पक्षी हे आलेच. आणि गोष्टी असतेथें बुद्धिवान मनुष्यप्राणी कां नसा- वेत ? अर्थात् असले पाहिजेत. बुद्धिवान मनुष्यप्राण्यांची कल्पना केली कीं, तेथें त्यांची राज्यें, समाज, निरनिराळ्या लोकोप- योगी संस्था; त्यांचीं काव्यें, इतिहास, नाटकें, शास्त्रीय ग्रंथ, आगगाड्या, तारायंत्रे यांसारखीं अचाट कृत्यें; वगैरे गोष्टी असा- वयाच्याच. याप्रमाणें नानाविध कल्पना करण्यास मन धांवतें. पण हा विषय कल्पनासृष्टीचा होय हे चांगले लक्षांत ठेविलें पाहिजे. याविषयीं कांहींहि माहिती मनुष्यप्राण्यांस आजपर्यंत मिळाली नाहीं, आणि कदाचित् ती कधींच मिळणार नाहीं. "शास्त्रीय विषय ह्मटला ह्मणजे त्यांत कल्पनातरंगांस जागा मिळ- तां उपयोगी नाहीं ही गोष्ट खरी; पण बुद्धीनें शोधून काढले- ल्या साधारण प्रदेशांतहि तिची बहीण कल्पना ही 'नको नको' ह्मणतां येतेच. मग अंतरिक्षस्थ चमत्कारांचें सौंदर्य व वैचित्र्य, रमणीयत्व व भव्यपणा, इतकी सामग्री असल्यावर कोणाची कल्पनाशक्ति स्तब्ध राहील ? असल्या आल्हादजनक व विस्म- यकारक स्थळ विरक्त मनुष्याचेंहि मन कल्पनातरंगांनी उचं- बळून जातें, आणि विचारशक्तीस विसंगत नाहींत अशा अनेक श्र