पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/२२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उपसंहार. २४१ नाहीं. जों जो मोठ्या शक्तीच्या दुर्बिणींतून हीं विशाल प्र- करणें पहावींत, तों तों तीं विश्वविवरांत अत्यंत दूर वसलीं आ हेतशीं भासतात; आणि विश्वविस्तार अमर्याद विस्तृत पसरला आहेसा वाटतो ! एकंदरींत हें विश्व अनंत, अपार, अगाध असून, परार्धांनीं देखील ज्यांची गणती करितां येणार नाहीं इतक्या असंख्य सूर्यांनी अगदीं गच्च भरलें आहे अशी आ पले मनाची खात्री होते. आपणांपासून जे तारे अत्यंत दूर आहेत, ते स्थिर व अचल आहेतसे भासतात. पण वास्तविक पाहतां ते स्थिर नाहींत. या विश्वामध्यें विश्रांति ह्मणून निमिषभर तरी कोणास आहे काय ? तारे झाले ह्मणून काय झाले? त्यांच्या पाठीमागें भ्रमण हे लागलें आहेच! ताऱ्यांच्या गति विलक्षण मोठ्या असल्या पाहिजेत. तारे आपणांपासून फारच फार दूर असल्यामुळे ते आज युगांनुयुगे जेथल्या तेथेंच आहेतसे दिसतात. परंतु वस्तुतः ते अत्यंत वेगानें अंतरिक्षांत भ्रमण करीत आहेत. ख रोखर, काल व आकाश या दोहोंसहि आदि व अंत नाहीं हे तत्व ज्योतिषशास्त्राचे ज्ञानानें मनांत पूर्णपणें बिंबून जातें. अंतरालांत जे तेजाचे अनेक बिंदु दिसतात, ते सर्व आपल्या भूगोलाप्रमाणें गोल आहेत, असें दुर्बिणीच्या साह्यानें एकवेळ समजले की कल्पनाशक्ति आपलें चातुर्य खर्चून तेथें सृष्टि तयार करण्यास निघालीच ! हे जे पृथ्वीपेक्षां कांहीं