पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/२२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४० अंतरिक्षांतील चमत्कार. तरी आली असेल. अंतरालांतील ताऱ्यांचे विशाल आकार, त्यांचीं अमर्याद अंतरें, कल्पना देखील करितां येत नाहीं असा त्यांच्या गतींचा वेग, कर्धीहि मोजतां येणार नाहीं अशी त्यांची संख्या, इत्यादि गोष्टींविषयीं विचार करितां कोणास मौज वाटणार नाहीं? पृथ्वीवरील सजीव व निर्जीव वस्तु ज्या द्रव्यांपासून झाल्या आहेत, तींच मूलद्रव्ये कोट्यावधि मैलांवर असणाऱ्या ताऱ्यांवर आहेत असे समजून कोण विस्मय पावणार नाहीं? सूर्यमालेतील जड पदार्थ ज्या निय- मांनीं नियंत्रित आहेत तेच नियम दूरदूरच्या आकाशस्थ जड पदार्थांवरहि आढळून येतात हे पाहून कोणास अचंबा होणार नाहीं ? याप्रमाणें अपरिमित अद्भुत चमत्कारांनी भरलेलें जें हें अनंत विश्व, त्याची अलौकिक रचना पाहून मनुष्यप्राणी विश्वाशीं क्षणभर तन्मय होऊन जातो. अगदीं सामान्य जनांपासून तो महान् तत्ववेत्त्यांपर्यंत सर्वांस मोहून टाकणारे असे जे अंतरिक्षांतील भव्य व रम्य चमत्कार ते पाहून मनुष्याचें मन आनंद, आश्चर्य, इत्यादि वृत्तींनी उचं- बळून जातें तें कोठवर वर्णावें? सूर्यमालेतील जड पदार्थांचीं अंतरें बिनचूक काढितां येतात, आणि त्यांचें मेजमाप घेतां येतें ही गोष्ट खरी. पण, आकाशगंगा, तारापुंज, धूमपुंज हीं जीं भव्य अजस्र प्रकरणें आहेत, यांचीं अंतरें कोण काढू शकेल? हीं प्रकरणें किती दूर आहेत हे यंत्रांनी समजत नाहीं, किंवा कल्पनेनें उमगत