पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सूर्य. परंतु, इतक्यावरून येथील प्राण्यांहून भिन्न प्रकृतीचे सुद्धां प्राणी सूर्यावर नसतील असें मात्र ह्मणतां येणार नाहीं. सूर्यमालेतील ग्रह वगैरे सर्व पदार्थांना उष्णता आणि उजेड हीं सूर्यापासून मिळतात, हें वर सांगितले आहेच. सूर्य- गोलापासून उष्णता आणि उजेड हीं एकसारखीं चोहोंकडे नेहमीं निघून जात आहेत. सूर्यगोलापासून उष्णतेचा जो वर्षाव एकसारखा सतत चोहोंकडे चालला आहे, त्यापैकीं फारच थोडा भाग आपल्या पृथ्वीवर येतो. सूर्यापासून रोज निघ- णाऱ्या उष्णतेचा दोन अब्जावा हिस्सा (२००००००००) मात्र आपल्या पृथ्वीला मिळतो. सूर्यमालेतील सर्व ग्रह व इतर पदार्थ यांना उष्णता व उजेड यांचा जो भाग मिळतो, तो सर्व जरी घेतला, तरी तो सूर्यापासून दररोज निघणाऱ्या उष्ण- तेचा व उजेडाचा अगदींच थोडा अंश आहे. तेव्हां, बाकीची सर्व उष्णता व उजेड हीं आकाशांत व्यर्थ जातात की काय, अशी शंका येते ! सूर्यापासून आपणांस उष्णता मिळते ह्मणून बरें आहे. जरकरितां कांहीं कारणांनी ही उष्णता मिळण्याचें बंद झालें, तर, या पृथ्वीवर प्राणी ह्मणून दृष्टीस पडणार नाहीं; महासागरांचें पाणी गोठून जाईल, आणि ही सर्व पृथ्वी थंड होईल! सूर्य आज जरी अत्यंत प्रचंड आगीचा गोळा आहे, तरी तो दिवसेंदिवस हळू हळू निवत चालला आहे. याप्रमाणें निवत जातां जातां तो अगदीं थंडगार निस्तेज होईल ! आतां हें खरें कीं, सूर्यास अगढ़ीं थंडगार होण्यास