पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६२ अंतरिक्षांतील चमत्कार. ज्योतिषी करितात. ह्या ज्वाळा सूर्यगोलाचे पृष्ठभागापासून कित्येक हजार मैलपर्यंत उंच जात असतात असें ह्मणतात. अशी एक फार उंच गेलेली ज्वाळा सन १८८० चे आक्टो- बरच्या ७ व्या तारखेस पाहण्यांत आली. ती उंच वाढतां वाढतां ३५०००० मैलपर्यंत उंच वाढली, आणि मग कमी होत होत नाहींशी झाली ! आणखी, खग्रास सूर्य- ग्रहणाच्या वेळीं सूर्यगोलाचे सभोवती जें एक चमत्कारिक तेजोवलय दृष्टीस पडतें, तें ९ व्या आकृतींत दाखविलें आहे. तसेंच, सूर्योदयाच्या पूर्वी व सूर्यास्तानंतर जो संधिप्रकाश दृष्टीस पडतो तोहि देखावा पाहण्यासारखा असतो. या दोन्ही चमत्कारांविषयींचीं खरीं कारणें अद्याप समजलीं नाहींत. यास्तव, त्यांविषयीं आज जास्त कांहीं सांगतां येत नाहीं. तरी, इतकें मात्र स्पष्ट होतें कीं, सूर्यगोलाच्या पृष्ठभागावर अत्यंत उष्णतेमुळे जळत असणाऱ्या वायूंचीं भयंकर वादळें सुटून हे सर्व चमत्कार घडत असावेत. रंगपट्टदर्शक यंत्राचे साह्यानें असें शोधून काढिलें आहे कीं, सूर्यावर हैड्रोजन, सोडियम्, स्ट्रॉनशियम्, म्याग्येशि- यम्, लोखंड, जस्त, शिसें, तांबें, वगैरे पृथ्वीवर सांपडणारे पुष्कळ पदार्थ आहेत. आतां, तेथें अत्यंत प्रचंड उष्णता अस ल्यामुळे हे सर्व पदार्थ वायुरूपी आहेत, जड किंवा प्रवाही स्थितींत नाहींत. असल्या भयंकर उष्णतेंत पृथ्वीवरील प्राण्यां- सारखे प्राणी सूर्यावर असूं शकणार नाहींत हैं उघड आहेच.