पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/२०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग १७. धूमपुंज. एखादी चांगलीशी दुर्बीण घेऊन ताऱ्यांचे चमत्कार पाहूं लागलें असतां अंतरिक्षांत कितीएक ठिकाणीं कांहीं विशेष प्रकारचे अद्भुत जड पदार्थ आहेत असें आपणांस दिसून येतें. हे जड पदार्थ काळ्यानिळ्या आकाशांत अंधुक लहान ढगां- प्रमाणे किंवा प्रकाशाच्या पुसट पुसट ठिपक्यांप्रमाणे दिस- तात. ह्यांस धूमपुंज हें नांव दिले आहे ते वाचकांस स्मरत असेलच. बहुतेक धूमपुंज दुर्बिणीवांचून दिसत नाहींत. हे ढगांप्रमाणे दिसतात असे ह्मटलें आहे; परंतु ज्यांस आपण ढंग समजतों ते ढग हे नव्हत. ढग आपल्या वातावरणांत फिरतात. परंतु ढगांप्रमाणे दिसणारे हे जड पदार्थ अंतरिक्षाच्या पोक- ळींत पराकाष्ठेचे दूर वसले आहेत. ढग सूर्याच्या किंवा चंद्रा- च्या प्रकाशानें तेजस्वी दिसतात; पण धूमपुंज यांस सूर्याप्र माणे अंगचा प्रकाश आहे. हे पृथ्वीपेक्षां कोट्यावधिपट