पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/२०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३२ अंतरिक्षांतील चमत्कार. मोठे ! पृथ्वीवरील समुद्राच्या पाण्याची वाफ होऊन झालेले ढग कोणीकडे, आणि ज्यांपासून लक्षावधि तारे ह्मणजे सूर्य आणि त्यांच्या अवाढव्य माला उत्पन्न व्हावयाच्या तं धूम- पुंज कोणीकडे ? वास्तविक पाहिले तर ढगांचें आणि या सुंदर जड पदार्थांचें खरें स्वरूप अत्यंत भिन्न व त्यांची तुलना करणेंहि अयोग्य. हे धूमपुंजांचे चमत्कार पहाण्याकडे ज्योतिष्यांचें लक्ष अलीकडे अनेक कारणांस्तव विशेष लागले आहे. त्यामुळे आज पर्यंत तीन चार हजार धूमपुंजांचा शोध लागला आहे. आणि जों जों अधिक शोध करावा, तों तो नवीन नवीन धूमपुंज सांपडतात. तेव्हां, या जातीचे जड पदार्थ अंतरिक्षांत अनंत असावेत असे वाटते. ताज्यांचे कित्येक पुंज नुसत्या डोळ्यांनी आणि लहान दुर्बि- णींतून देखील धूमपुंजांप्रमाणे दिसतात. पण मोठ्या दुर्बिणीं- तून त्यांतील तारे पृथक् पृथक् दृष्टीस पडतात. यावरून, ज्यांस आपण धूमपुंज असें आज समजतों ते सर्व तान्यांचे पुंजच असतील, आणि त्यांतील तारे इतके दूर असतील कीं ते पृथक् पृथक् दाखविण्याची शक्ति आजकालच्या मोठमोठ्या दुर्बि णींतहि नाहीं, असें प्रथम वाटणें अगदीं साहजिक आहे. इत- केंच नव्हे, तर असें मागील पिढीच्या ज्योतिष्यांस वाटलेंहि होतें. पण मागें दुसऱ्या भागांत सांगितलेल्या रंगपट्टदर्शक - त्राच्या साह्यानें आजला असें स्पष्ट दिसून आले आहे कीं,