पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/२०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आकाशगंगा. २२९ आहेत याचीहि कल्पना करितां येणार नाहीं. कितीहि मोठी दुर्बीण घेतली, तरी तींतून सुद्धां त्या ताऱ्यांचीं विवें किंचित् देखील मोठीं दिसत नाहींत, किंवा त्यांच्या अंतरांची कल्पना होत नाहीं. इतकेंच नव्हे तर उलट असे मात्र अनुभवास येतें कीं, जों जो मोठ्या दुर्बिणींतून हे तारे पहा- वयास जावें तों तों ते दूर दूर गेले आहेतसे वाटतात ! ज्या अगणित ताऱ्यांच्या दाटीनें आकाशगंगेचा पट्टा आपणांस दिसतो ते एकमेकांच्या अत्यंत जवळ असावेत असें सहज वाटणार आहे. पण, असें मानणे चुकीचें होईल. वास्तविक पाहिलें तर हे तारे एकमेकांपासून कोट्यावधि मैल दूर आहेत. परंतु, त्या सर्वांचें अंतर आपणांपासून परमा- वधीचें असल्यामुळे ते जवळ जवळ अगदीं चिकटलेले आहे- तसे आपणांस भासतात. एखाद्या निबिड अरण्यांतील झाडें दुरून पाहिलीं असतां, तीं अगदीं एकमेकांजवळ आहेत असे वाटत नाहीं काय? आपला सूर्यहि ह्या गंगेतील अनं- तकोटि ताऱ्यांपैकींच एक मध्यमसा तारा आहे. आणि आकाशगंगेच्या दुसऱ्या एका भागावरून जर आपल्या सूर्या कडे पहातां आलें, तर तोहि अनंत तान्यांच्या गर्दीत मिस- ळून गेला आहे असें दिसून येईल. पण, आपल्या मालेमध्यें आणि आकाशगंगेच्या दुसऱ्या तान्यांमध्यें केवढे तरी अंतर आहे ! तेव्हां निदान इतकेंच अंतर तरी आकाशगंगेतील प्रत्येक ताऱ्यामध्यें असले पाहिजे. मग एकमेकांपासून इतक्या