पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/२०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२८ अंतरिक्षांतील चमत्कार. कारक गोष्ट झटली ह्मणजे ही आहे कीं, एवढा आपला प्रचंड सूर्य पण त्याचीहि गणना आकाशगंगेतील अनंतकोटि व आपणांस सूक्ष्म दिसणाऱ्या ताऱ्यांतच होत आहे. आकाशगंगेचें सूक्ष्म निरीक्षण केले असतां असे आढळून येतें कीं, असंख्यात तारे एकत्र दाटीनें मिसळले आहेत, आणि त्यांची ही एक विचित्र रचना झाली आहे ! जसजसें आपण आकाशगंगेकडे पाहूं लागावें, तसतसे तारे अधिका- धिक दाट एकत्र जमले आहेत असें नजरेस येतें. ह्या पट्ट्याची लांबी इतकी आहे कीं, ह्याचें आप- गांभोंवतीं एक वर्तुल झाले आहे. तेव्हां हा पट्टा किती लांब असावा है सांगणें दुरापास्त होय. याची रुंदी सर्वत्र सारखी नाहीं, कमीजास्त आहे. या पट्टयांत शेंकडों तारा- गुच्छ, सहस्रावधि तारापुंज आणि अगणित तारे आहेत ! मग, यांत किती ग्रहमाला आणि काय काय चमत्कार अस- तील याची कल्पनाहि करितां येणार नाहीं हें उघड आहे. जों जों मोठ्या शक्तीच्या दुर्बिणींतून या पट्टयाकडे पहावें तों तो अनंतकोटि सूर्य आकाशगंगेत अगदीं खचून भरले आहेत असे पाहण्यांत येतें. बरें इतकेंहि असून आकाशगं- गेचा आणखी भाग पलीकडे विश्वविवरांत दिसत असतोच, त्यास सीमा ह्मणून नाहींच ! आकाशगंगेतील तारे आपणांपासून किती दूर आहेत हें सांगतां येणें शक्य नाहीं. तसेंच, त्यांचे आकार केवढाले