पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/२०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आकाशगंगा. २२७ पट्ट्याविषयीं उल्लेख केलेला आढळून येतो. संस्कृत ग्रंथांत तर आकाशगंगेवर नानाप्रकारच्या हृदयंगम उपमा व कल्पना बसविलेल्या वाचनांत येतात. याप्रमाणें हा अंतरिक्षस्थ चम- त्कार कवींपासून तों सामान्य जनांपर्यंत सर्वांना पूर्वीपासून फार आल्हाददायक होऊन बसला आहे. अलीकडील ज्योति- पशास्त्रांतील शोधांवरून सुद्धां आकाशगंगेचें महत्व कमी न होतां उलट विशेष वाढले आहे. ते कसें हें पुढील विवेच- नावरून कळून येईल. एरवीं नुसत्या डोळ्यांनी पाहिले असतां आकाशगंगा ही प्रकाशाचा एक पट्टा आहे असे वाटतें. (आ० ४३ वी पहा.) दुर्बी पाहिले असतां कोट्यानकोटि तारे एकत्र होऊन आकाशगंगा बनली आहे असे समजून येतें. हे तारे आपणांपासून इतके दूर आहेत की, त्यांचा प्रकाश पृथक् पृथक् आपणांस दिसत नाहीं; त्या सर्वांचा प्रकाश एकवटून येतो ह्मणून आपणांस आकाशगंगेचा पट्टा दिसतो. आकाश- गंगेंतील अत्यंत तेजस्वी चकाकणाऱ्या ताऱ्यांपासून तों अगदीं अंधक दिसणाऱ्या ताऱ्यांपर्यंत प्रत्येक तारा आपल्या सूर्याप्र माणे प्रचंड सूर्य आहे; इतकेंच नव्हे तर यांपैकीं पुष्कळ तारे आपल्या सूर्यापेक्षां देखील शेंकडोंपट मोठे येतील! तेव्हां, असल्या ताऱ्यांचा एवढा मोठा समुदाय ह्मणजे हे अनंत सूर्य मिळून आकाशगंगा झाली आहे हे समजून आपणांस केवढा चमत्कार वाटतो ! त्यांत आणखी आपणांस विशेष विस्मय-