पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/२०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तारापुंज आणि तारागुच्छ. चतुष्कोनाकृति बनलेली दिसून येते; या चतुष्कोनाकृती- मध्यें ठळक तीन तारे दृष्टीस पडतात. आणखी या ठळक तीन ताऱ्यांच्या खालीं जे दुसरे तीन तारे दिसतात, त्यांपैकी मधल्या ताज्याजवळ एक अत्यंत मनोहर धूमपुंज दुर्बि- णींतून दिसतो. याप्रमाणें अनेक कारणांस्तव हा तारापुंज सामान्य जनांस व विद्वान् पंडितांस प्रिय होऊन बसला आहे. पुराणांत एक कथा आहे कीं, स्वतःच्या रूपवती कन्येचें मोहक स्वरूप पाहून ब्रह्मदेवाचें मन चलबिचल झालें. तेव्हां ती सुशील कन्या हरिणीचें रूप धारण करून पळू लागली, तो ब्रह्मदेवाचीहि स्वारी हरिण होऊन तिच्यापाठीमार्गे लागली. हा प्रकार जेव्हां शिवाला समजला, तेव्हां हरिणरूपी ब्रह्मदेवास मारण्याकरितां शिवाची स्वारी व्याधाचें रूप धारण करून निघाली. मृगनक्षत्राचा जो पुंज आतां आह्मीं सांगितला तोच मृगरूपी ब्रह्मदेव, आणि लुब्धक तारा हा व्याध बनलेला शिव आणि मृगपुंजांत दिसणारे तीन तारे हे त्या व्याधानें मृगावर सोडलेले बाण—याप्रमाणे पुराणांतील कथेचें हुबेहूब चित्र आपल्या पूर्वजांनी फार सुरस व मार्मिक रीतीनें ह्या अवर्णनीय पुंजाच्या द्वारें लोकांपुढे ठेवून दिलें आहे ! वर सांगितलेल्या पुंजांप्रमाणेच बारा राशींचे पुंज आणि इतर तारापुंज सूक्ष्म अवलोकन करून ध्यानांत ठेवण्यासारखे आहेत. 9 या सर्व पुंजांखेरीज आणखी अनेक तारापुंज दुर्बिणीच्या १५ २२५