पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/२००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२४ अंतरिक्षांतील चमत्कार. दिलें आहे. या पुंजाचे साधारण मध्यभागी एक पांदुरकी लहानशा ढगासारखी आकृति नुसत्या डोळ्यांनी पाहण्यांत येते. हीच आकृति चांगल्या दुर्बिणीनें पाहिली असतां कांहीं विलक्षणच देखावा दृष्टीस पडतो. या पुंजाच्या मध्यभागीं जो एक मोठा विस्मयकारक धूमपुंज आहे त्याची ही आकृति आहे. याविषयीं पुढें सविस्तर सांगण्यांत येईल. हिवाळ्यांत काळोख्या रात्रीं अंतरिक्षांतील तारे पाहण्यास लागलें असतां आपलें लक्ष एका भागाकडे चटकन् जातें. का- रण, या वेळीं ह्या भागाला एका तारापुंजामुळे फारच सुंदर शोभा आलेली दृष्टीस पडते. हा पुंज मृगनक्षत्राचा होय. पौषाच्या किंवा माघाच्या महिन्यांत आकाश बहुधा स्वच्छ निरभ्र असतें. या महिन्यांत काळोख्या रात्री हा तारापुंज फारच रमणीय वाटतो तो इतका कीं, यासारखा सुंदर तारापुंज अंतरिक्षांत दुसरा एकहि पाहण्यांत येत नाहीं. शिवाय, या पुंजाच्या किंचित् खालच्या बाजूस लुब्धक हा अत्यंत तेजस्वी तारा लकाकत असतो आणि वरच्या बाजूम रोहिणीचा लाल तारा चमकत असतो. याप्रमाणें ह्या पुंजा- जवळ दुसऱ्या पुंजांतील कांहीं अत्यंत तेजस्वी तारे एकाच क्षणीं दृष्टीस पडतात. ह्मणून अंतरिक्षाचा हा भाग हिवाळ्यांत फारच चित्तवेधक वाटतो, आणि याकडे कितीहि पाहिलें तरी आणखी पहावेंसें वाटतें. या पुंजाच्या चारी बाजूच्या कोंप- ऱ्यांवर चार ठळक तारे आहेत, आणि त्यामुळे एक कांहींशीं