पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/२०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२६ अंतरिक्षांतील चमत्कार. साह्यानें कळून आले आहेत. या जातीच्या पुंजांचें स्वरूप कांहीं विलक्षणच असतें. असंख्यात तारे मिळून हे पुंज बन- लेले असतात. आणि ह्मणून यांस तारागुच्छ हें नांव विशेष शोभतें. हे तारागुच्छ बहुधा नुसत्या डोळ्यांनी दिसत नाहींत; आणि जे कांहीं दिसतात त्यांचा देखावा एखाद्या लहानशा ढगाच्या तुकड्यांप्रमाणे दिसतो. ह्यांकडे दुर्बिणींतून पाहिलें लणजे सहस्रावधि तारे एकवटून जमा झाले आहेत असा अपूर्व देखावा पाहण्यास सांपडतो. ४२ व्या आकृतींत या प्रकारचा एक तारागुच्छ दाखविला आहे. हा तारागुच्छ पाहून असा भास कीं, नीलवर्ण आकाशपटावर लक्षावधि मोत्यें एकत्र करून ही एक रास केली आहे, किंवा शुभ्र पांढऱ्या अशा पुष्पांचा हा एक मनोहर गुच्छच तयार केला आहे ! ८ आकाशगंगा. स्वच्छ काळोख्या रात्री आकाशाकडे सहज पाहिलें असतां एक अंधुक लांबच लांब पांढुरका पट्टा कमानीसा- रखा पसरलेला दृष्टीस पडतो. यास आपण आकाशगंगा ह्मणतों, आणि यूरोपांतील लोक मिल्की वे (Milky Way) ह्मणजे दुग्धमार्ग- ह्मणतात. या पट्टयाकडे लोकांचें लक्ष फार प्राचीन काळापासून लागले असावें ही गोष्ट निर्विवाद आहे. सर्व देशांतील प्राचीन काव्यांत आणि इतर ग्रंथांत या