पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/१९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तारापुंज आणि तारागुच्छ. २२३ सप्तर्षीचा पुंज सर्वांस माहीत आहेच. याची आकृति पूर्वी याच भागांत दिली आहे. ( आकृति ३८ वी पहा ). यांत प्रथमदर्शनीं सात ठळक तारे दिसतात. प्राचीन काळच्या सप्तर्षीचा महिमा सर्वत्र प्रसिद्ध आहेच. तेव्हां, त्यावरून या पुंजाचे ठायीं सप्तर्षींची कल्पना करून यास तेंच नांव दिलें आहे. या पुंजाची चांगली माहिती असणें अनेक कार- णांस्तव इष्ट आहे. साधारण चौरसाकृति करितां येते असे जे या पुंजांतील पुढील चार तारे आहेत, त्यांपैकीं पुढल्या दोन ताज्यांस ध्रुवदर्शक तारे अर्से ह्मणतात. कारण की, या दोन ताऱ्यांपासून सरळ रेघ काढली असतां ती थेट ध्रुव- नक्षत्रावर जाऊन पोचते, आणि या रीतीनें ध्रुवनक्षत्र अंत- रिक्षांत सहज ओळखतां येतें. या पुंजास यूरोपांतील लोक ग्रेट बेअर (Great Bear ) झणजे बृहऋक्ष ( मोठें आस्वल ) अर्से ह्मणतात. कारण, तिकडील लोकांनी या पुंजां- तील ताऱ्यांची एका मोठ्या आस्वलाच्या आकृतीसारखी आकृति बनते अशी कल्पना केली आहे. यांतील पाठीमा- गील तीन ताज्यांपैकीं मधला तारा दुर्बिणींतून सुंदर जोड- तारा दिसतो हे मार्गे सांगितले आहेच. दुर्बिणीनें पाहिलें असतां यांत शेंकडों तारे आहेत असें दृष्टोत्पत्तीस येतें ! • 'देवयानी' या नांवाचा एक पुंज उत्तरगोलार्धात आहे. या पुंजास यूरोपांतील लोक 'अंड्रोमीडा' ह्मणतात, आणि यास 'देवयानी' हें नांव कै० बाळ गंगाधर शास्त्री यांनी