पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सूर्य. ६१ सुमारें अकरा वर्षांत डागांचा एक फेरा पुरा होतोसा दिसतो. असे अगदी नियमानें कां होतें, व याचा परिणाम काय होत असावा, याविषयीं निश्चयात्मक कांहींच समजलें नाहीं. परंतु, याचा आणि पृथ्वीवर दुष्काळ पडतात यांचा कांहीं तरी संबंध असावा असे मोठमोठ्या विद्वानांचें मत आहे. कै. प्रोफेसर केरोपंत छत्रे यांचेंहि ह्मणणें असेंच होतें. सूर्यगोलाचे बाजूंस कांहीं विलक्षण चमत्कारिक पदार्थ दृष्टीस पडतात. या पदार्थांचा प्रकाश सूर्याचे प्रकाशापेक्षां मंद आहे. यास्तव, तारे जसे दिवसां दिसत नाहींत, तसेच हे अंधक पदार्थ सूर्याचे प्रखर तेजामुळे आपल्या पाहण्यांत येत .नाहींत. परंतु, पृथ्वी आणि सूर्य यांचे मध्ये चंद्र आला असतां सूर्यास खग्रास ग्रहण लागून पृथ्वीवर जेव्हां काळाकिट्ट अंघार पडतो, त्या वेळेस हे पदार्थ सूर्यगोलाच्या बाजूंस उंच उडतांना दृष्टीस पडतात. ८ व्या आकृतींत सूर्याचें खग्रास ग्रहण लागून जे उंच उडणारे पदार्थ सूर्यगोलाचे बाजूंस पाहण्यांत येतात ते दाखविले आहेत. हे पदार्थ काय असावेत हें अद्याप पूर्णपणे समजलें नाहीं. सूर्य हा एक प्रचंड आगीचा गोळा आहे, आणि यावरील सर्व द्रव्यें वायुरूपी असून तीं एकसारखीं जळत आहेत; यावरून हे पदार्थ ह्मणजे सूर्य- गोलाच्या प्रचंड भट्टींत जळणाऱ्या वायूंच्या ज्वाळा असा- च्यात, आणि सूर्यगोलाचा पृष्ठभाग सोडून ह्या ज्वाळा पुष्कळ लांबपर्यंत जात असाव्यात, असें अनुमान कांहीं