पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/१९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२२ अंतरिक्षांतील चमत्कार. सूर्यामुळें चोहोंकडे हिरवेंगार होऊन गेलें आहे; आणि तिसरे दिवशीं पहावें तो तांबडा व हिरवा असे दोन्हीहि सूर्य एक- दम उगवले असून त्यामुळे सर्व देखावा केवळ अवर्णनीय झाला आहे ! अशा मनोरम देखाव्याचें हुबेहूब वर्णन कल्प- नेनेंहि करितां येणें शक्य नाहीं. ७. तारापुंज आणि तारागुच्छ. अंतरिक्षांतील देखाव्याचें अवलोकन करीत असतां कित्येक ठिकाणीं कांहीं तारे मिळून स्पष्ट पुंज झाले आहेत असे आपण पाहतों. ज्यांनीं सप्तर्षीचे ताऱ्यांचा पुंज पाहिला नाहीं, किंवा ज्यांस मृगनक्षत्रांचा पुंज माहीत नाहीं असे गृहस्थ असले तर फारच थोडे असतील. असे पुंज अंतरिक्षांत शेंकडों आहेत. हे पुंज पाहून त्यांस ओळखण्याकरितां कांहीं परिचित वस्तूंच्या प्राण्यांच्या किंवा व्यक्तींच्या आकारसाह- श्याची कल्पना करून त्यांचीं नांवें या पुंजांस देण्याची चाल फार प्राचीन काळापासून पडली आहे. ज्यांस अशीं नांवें देण्यांत आली आहेत आणि ज्यांविषयीं बरीचशी माहिती मिळाली आहे, असे पुंज २००/३०० निघतील ! या सर्वांचें वर्णन अर्थात् विस्तारभयास्तव आम्हांस येथें देतां येत नाहीं. ह्मणून प्रसिद्ध अशा तीन चार तारापुंजांविषयीं मात्र थोडीशी माहिती सांगतों.