पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/१९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तारायुग्में किंवा जोडतारे. २२१ असा कीं, हे तारे पृथक पृथक् स्पष्ट दिसतात; इतकेंच नव्हे, तर चार तारे मिळून जोडता यांच्या दोन जोड्या बनल्या आहेत असें दृष्टीस पडतें. हा अपूर्व देखावा पाहून असें वाटतें कीं, ह्या दोन जोड्यांचा परस्परांशी संबंध असलाच पाहिजे, आणि एक जोडी दुसऱ्या जोडीभोंवतीं फिरत असली पाहिजे ! या प्रकारच्या जड पदार्थांविषय विचार करीत असतां नानाप्रकारचे तर्क केल्यावांचून आपलें मन राहत नाहीं. जरी हे तारे अत्यंत सूक्ष्म दिसतात, तरी ते आकारानें आणि वैभ- वानें आपल्या सूर्यासारखे - किंबहुना सूर्यापेक्षांहि-मोठे प्रचंड सूर्य आहेत. यांच्याभोंवतीं फिरणाऱ्या ग्रहमाला आहेत असें निश्चयपूर्वक सांगतां येत नाहीं हें खरें. तरी पण जर तेथें ग्रह असतील, तर त्यांना दोन किंवा अधिक सूर्यापासून उष्णता व उजेड मिळून तेथील लोकांस केवढी मौज पहा- ण्यास सांपडत असेल ! कधीं दोन्ही सूर्य अंतरिक्षांत देदी- प्यमान झाले आहेत, तर कधीं एकच सूर्य अंतरिक्षाचें राज्य करीत आहे, आणि कधीं दोन्हीहि अस्त पावले आहेत असा विलक्षण देखावा दिसत असेल !! त्यांतून, जर हे दोन्ही सूर्य निरनिराळ्या रंगांचे असले तर तेथील देखावा खरोखर अपूर्वच असला पाहिजे. पहिले दिवशीं तांबडा सूर्य आकाशांत विराजमान होऊन त्यानें सर्व विश्व तांबडे लाल करून टाकिलें आहे, तर दुसऱ्या दिवशीं हिरव्या