पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/१९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२० अंतरिक्षांतील चमत्कार. सूर्यमालेत विशेष नसून ह्यांचा अंमल विश्वविवरांतील दूरच्या अन्य प्रदेशींहि सर्व ठिकाणी सारखाच लागू आहे असे आढळून आलें ! सारांश, सूक्ष्म अणूपासून तों प्रचंड गोला- पर्यंत विश्वांतील यच्चावत् जड पदार्थ एकाच नियमानें नियं- त्रित आहेत, ही अद्भुत गोष्ट जोडताऱ्यांच्या गतींवरून आपणांस प्रथम समजून आली ! मिथुनराशींत जे मुख्य दोन तारे आहेत त्यांतील एक अंमळ ठळक दिसतो. यास क्यास्टर ह्मणतात. हा एरवीं नुसत्या डोळ्यांनी एकच तारा दिसतो. पण दुर्बिणींतून पाहिले असतां हे दोन तारे आहेत असें स्पष्ट दिसून येतें. क्यास्टरच्या सोबत्याचें दर्शन साधारण लहानशा दुर्बिणींतून होणारे आहे. या जोडींतील एक तारा दुसऱ्याभोवती फिरत आहे असें सूक्ष्म अवलोक- नाअंती आढळून आले आहे. याची गति फारच मंद आहे. यास्तव याचा एक फेरा पुरा होण्यास कित्येक शतकें पाहिजेत. सप्तर्षीचे जे पाठीमागील तीन तारे आहेत, त्यांतील मधला तारा जोडतारा आहे. ह्या मधल्या तान्याकडे नुसत्या डोळ्यांनी पाहिले असतां त्याचें जवळ एक लहानसा तारा दिसतो. तो तारा सोडून ह्या नुसत्या मधल्या ताज्याकडे पा- हिले असतां तो एकटा नसून जोडतारा आहे असे दिसतें. तूळ राशींत एक सुंदर जोडतारा आहे. नुसत्या डोळ्यांनीं देखील हे दोन तारे असावेतसे वाटतें. पण याकडे दुर्बिणीं- तून पाहिलें तर फारच मजेचा देखावा पहाण्यांत येतो. तो