पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/१९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तारायुग्में किंवा जोडतारे. २१९ तो मार्ग दीर्घवर्तुलाकार असतो. ही गोष्ट इतकी महत्त्वाची कां वाटावी ? पृथ्वी सूर्याभोंवतीं दीर्घवर्तुल मार्गानें फिरत नाहीं का ? इतर ग्रहांचेहि मार्ग दीर्घवर्तुलाकारच आहेत. मग, एक सूर्य दुसऱ्या सूर्याभोवती फिरत असल्यास त्याचाहि मार्ग दीर्घवर्तुलाकारच असावा यांत विशेष तें काय असें प्रथम वाटणें साहजिक आहे; पण सूक्ष्म विचार केला असतां ह्या गोष्टीचें महत्व वाचकांस सहज समजून येईल. सूर्य- मार्लेत असणाऱ्या ग्रहादि जड पदार्थांचे गतीविषयीं सूक्ष्म विचार करून आकर्षणनियमांचा शोध न्यूटन या महा- पुरुषानें लाविला. या नियमांचा अंमल सूर्यमालेत सर्वत्र पूर्ण- पणे दिसून येतो. इतकेंच नव्हे, तर ग्रहादिकांचे मार्ग कमी अधिक दीर्घवर्तुलाकारच पाहिजेत असेंहि याच नियमांवरून केप्लर यानें सिद्ध केलें. याप्रमाणें केप्लर यानें शोधून काढि- लेल्या नियमांच्या योगें आपल्या मातील ग्रहादिकांच्या गति अगदीं बिनचूक काढितां येतात. आतां आपली माला विश्वांतील एक लहानसा स्वतंत्र टापू आहे हे वाचकांस कळलें आहेच. तेव्हां या टापूंत आढळून येणारा कायदा- आकर्षणाचे नियम-याच ठिकाणीं उत्पन्न झालेला असावा, आणि त्याचा अंमल काय तो सूर्यमालेतच असावयाचा असे पूर्वी वाटत असे. पण जेव्हां जोडताऱ्यांतील एक तारा दुसऱ्या तायाभोवतीं दीविर्तुल मार्गानें फिरत आहे असे ज्योतिषज्ञांनीं शोधून काढिलें, तेव्हां हेच आकर्षणनियम