पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/१९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१८ अंतरिक्षांतील चमत्कार. दकारक व सुंदर दिसतात. एरवीं नुसत्या डोळ्यांनीं पहात असतां जे आपणांस एकटेच तारे आहेतसे वाटतात, त्यांपैकी कित्येक जोडतारे आहेत असें दुर्बिणींतून पाहिलें असतां आढळून येतें. दोन तारे एकमेकांच्या इतके जवळ असतात कीं ते दोन तारे आहेत असे आपणांस नुसत्या डोळ्यांनीं दिसत नाहीं; परंतु, दुर्बिणीचा उपयोग केला असतां ते दोन तारे पृथक् पृथक् स्पष्ट दृष्टीस पडतात. अशा प्रकारचे जोडतारे आजपर्यंत शेंकडों सांपडले आहेत. या ताऱ्यांसंबंधानें विशेष लक्षांत ठेवण्यासारखी एक गोष्ट आहे. ती ही कीं, त्यांचा परस्पर संबंध असून त्यांपैकी एक दुसऱ्याभोवती फिरत असतो, आणि ह्मणून त्यांस तारायुग्म किंवा जोडतारा असें ह्मणतात. तारे हे सूर्य आहेत ही गोष्ट लक्षांत आणिली असतां, एक सूर्य दुसऱ्या सूर्याभोवती फिरत आहे हे पाहून चमत्कार वाटल्यावांचून राहणार नाहीं. पृथ्वी ही सूर्याभोंवतीं फिरते आणि पृथ्वीभोंवतीं चंद्र फिरतो; तसेंच इतर ग्रह सूर्याभोंवत फिरतात, ही गोष्ट सूर्यमालेविषय विचार करीत असतां आपणांस समजून आली; परंतु, एक सूर्य दुसऱ्या सूर्याभोवतीं ग्रहांप्रमाणें भ्रमण करीत आहे ही गोष्ट जोडताऱ्यांचे निरीक्षणावरूनच प्रथम कळून येते. आणखी दुसरी एक महत्त्वाची गोष्ट जोडताऱ्यांचे निरी- क्षणावरून समजून आली आहे. ती अशी कीं, जोडतायां- तील एक तारा दुसऱ्या ताऱ्याभोवती ज्या मार्गानें फिरतो