पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/१९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तारायुग्में किंवा जोडतारे. २१७ तसाच कदाचित् मुंबईचाहि पत्ता त्यांस लागणार नाहीं. गंगा नदीच्या ठिकाणी एखादा लहानसा ओढा तरी त्यांच्या नज- रेस पडेल कीं नाहीं याचा वानवाच ! आपला हा विचारा १९ वा शतक प्राचीन काळांत मोडला जाईल व आज ज्याप्र माणें आपणांस वेदकाळ प्राचीन वाटतो त्यापेक्षांहि शेंकडोंपट अधिक प्राचीन हल्लींचा काळ त्या काळच्या लोकांस वाटेल. आपल्यापेक्षां हजारोंपट अधिक बुद्धिमान् प्राणी निपजतील. आणि वाचकहो, कदाचित् असेंहि घडेल कीं कांचेच्या कपाटांत जवळ जवळ ठेवलेले तुमचे आमचे सांगाडे त्या काळचे लोक प्रदर्शनांत दाखवितील, आणि ह्मणतील कीं "हीं पहा १९ व्या शतकांतलीं माणसें ! ही रानटी तर खरींच, पण शास्त्री- य ज्ञान मिळविण्याची योग्यता थोडीशी यांना आल्यासारखी दिसते. " याप्रमाणे तुमची व आमची दोघांचीहि भेट ११९ व्या शतकांत कशावरून होणार नाहीं ? कालाचा महिमा असाच आहे ! पण मनुष्याच्या अंगीं काय अभिमान व अहंकार ! एकीकडे अगाध विश्वविस्तार आणि दुसरीकडे मनुष्यप्राण्याची पोरकट हांव हीं पाहून तत्ववेत्याच्या मनाला काय वाटत असेल बरें ? ६. तारायुग्में किंवा जोडतारे. अंतरालांत तारायुग्में किंवा जोडतारे हे फार आल्हा-