पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/१९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१६ अंतरिक्षांतील चमत्कार. त्या काळीं आजचा एक तरी देश अस्तित्वांत आला होता काय ! मी मी ह्मणणारीं व वर्चस्वासाठीं एकमेकांच्या नाशास प्रवृत्त होणारीं आजचीं सुधारलेलीं राष्ट्रे त्या काळीं जन्मा- सहि आली नव्हतीं. बहुशः त्या काळीं मनुष्यप्राणी उत्पन्न झाला असेल, पण त्याची स्थिति कशी होती व त्याची सुधा- रणा कोणत्या पायरीपर्यंत येऊन पोंचली होती, हें खात्रीपू- र्वक समजण्यास आज मार्ग उरला नाहीं. बहुतकरून त्या काळचीं माणसें- ह्मणजे जगाच्या रंगभूमीवर नुक्तींच आलेली पात्रे-वन्य पशूंप्रमाणें सैरावरा हिंडत असतील. ही त्या काळची स्थिति ! आतां पुढें ५० हजार वर्षांनीं जेव्हां सप्त- ऋषि ४१ व्या आकृतीप्रमाणें आकाशांत दिसतील, तेव्हां आपण कोठें जाऊं व आपली काय स्थिति होईल? इंग्रज व फ्रेंच, हिंदु व मुसलमान, पारशी व यहुदी हे सर्व काळाच्या जबड्यांत गडप होऊन त्यांचा मागमूसहि राहणार नाहीं. काळाचें भक्ष्य नाहीं असें ह्या विश्वांत काय आहे ? कालच- क्रांतून सुटून जाण्याचें कोणाला सामर्थ्य आहे ? त्या काळीं नवीं राज्यें, नवे लोक, नवे धर्म, नव्या विद्या, नव्या कला या जगतीतलावर प्रसृत होतील. ज्या मुंबईचें आज आप णांस इतकें वैभव वाटत आहे ती मुंबई कोठें होती, हें शोधून काढण्याकरितां लोक समुद्रकिनाऱ्यावर फिरतील. आणि हस्तिनापुर विराटनगर इत्यादि पुरातन काळच्या अति विख्यात शहरांचाहि पत्ता आज आपणांस जसा लागत नाहीं