पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/१९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ताऱ्यांच्या गति. २१५ ४००० वर्षांपूर्वीच्या आणि आजच्या त्याच्या प्रकाशांत किंचित् सुद्धां फरक नाहीं ! याप्रमाणें या अनंत अमर्याद अगाध अंतरिक्षांत तारे चोहों- कडे फारच मोठ्या वेगानें धांवत सुटले आहेत. आणि तरी देखील वर्षांनुवर्षे ते सर्व जेथल्या तेथेंच आहेतसे आपणांस भासतात, व तारे स्थिर आहेत असे आपण समजतों. ताऱ्यांच्या गतींमुळें तारापुंजांचे आकार अर्थात् बदलले पाहिजेत; पण ताऱ्यांच्या परमावधीच्या अंतरांमुळे तारापुं- जांच्या आकारांतील फरक इतका सूक्ष्म असतो कीं थोडासा सुद्धां फरक समजून येण्यास कित्येक शतकें लोटलीं पाहिजेत. ५० हजार वर्षे हा काल आपणांस किती मोठा वाटतो ! पण एवढ्या मोठ्या कालमर्यादेंत सुद्धां तारापुंजांच्या आकारांत किती थोडा बदल होतो तें पहा. ३९ व्या आकृतींत सप्त- ऋषीपुंजाचा सांप्रत दिसणारा आकार दाखविला आहे. हेच सप्तऋषि ५० हजार वर्षांपूर्वी ४० व्या आकृतींत दाखवि- ल्याप्रमाणे दिसत होते, आणि आजपासून ५० हजार वर्षांनी हेच सप्तऋषि ४१ व्या आकृतींत दाखविल्याप्रमाणें दिसतील. ५० हजार वर्षांत सप्तऋषींच्या आकारांत इतकाच फरक होतो ! पण या ५० हजार वर्षांच्या कालमर्यादेंत आपल्या भूतलावर काय काय घडामोडी व घाल- मेली होऊन जातात बरें ! ज्या काळी ३९ व्या आकृतीप्र- माणे १० हजार वर्षांपूर्वी सप्तऋषि अंतरिक्षांत दिसत होते