पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/१८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ताऱ्यांच्या गति. २१३ असे वाटतें कीं, ज्यावर चित्रविचित्र रंगांचे मौल्यवान् खडे बसविले आहेत अशा एखाद्या सुंदर चित्रपटाकडे आपण पहात आहों ! ताऱ्यांचे हे रंग नुसत्या डोळ्यांनीं दिसत नाहींत. दुर्बिणींतून मात्र हे रंग फार सुंदर व स्पष्ट दिसतात. ताऱ्यांचे हे निरनिराळे चित्तवेधक चमत्कार का होतात याविषयीं ज्योतिषी लोक निरनिराळीं अनुमानें करितात; परंतु याचें कारण काय असावें याविषयीं निश्चयात्मक असें अद्याप कांहींच समजलें नाहीं. ताऱ्यांच्या गति. पुष्कळ दिवस लोक असे समजत असत कीं, तारे स्थिर आहेत, त्यांस गति मुळींच नाहींत. आणि लोकांची अशी समजूत होणें हें अगढ़ीं साहजिकच होतें; कारण कित्येक वर्षे जरी ताऱ्यांचें निरीक्षण केलें, तरी त्यांचें परस्परांमधील अंतर किंचित् देखील कमीजास्त झाल्याचें आढळून येत नाहीं. परंतु अलीकडे निघालेल्या नवीन यंत्रांनीं ताज्यांचे वेध घेऊन ज्योतिष्यांनीं असें सिद्ध केले आहे कीं तारे अचल नाहींत, तर ते अत्यंत वेगानें अंतरिक्षांत भ्रमण करीत आहेत. अनंत अंतरालांत दिसणाऱ्या असंख्य ताऱ्यांपैकी प्रत्येक तारा - ह्मणजे असंख्य सूर्यांपैकी प्रत्येक सूर्य-आपल्याच्यानें कल्पनाहि करवणार नाहीं इतक्या मोठ्या वेगानें धांवत आहे