पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/१८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१४ अंतरिक्षांतील चमत्कार. हें मनांत येऊन आपण विस्मयभरित होत. ताऱ्यांच्या गतींचा वेग जरी फार मोठा आहे, तरी ह्या गति इतक्या मंद- सूक्ष्म - वाटतात की त्या आहेत हेच समजून येण्यास कित्येक शतकांचा अनुभव लागतो ! ह्याचें कारण ताऱ्यांचें आपणांपा- सून परमावधीचें अंतर ! स्वातीच्या ताज्याची गति एका दिवसांत ४४ लक्ष मैल जाण्याची आहे; आणि इतकें असू- नहि ६ इंच रुंदी इतकी आकाशाची जागा सरकण्याला या तान्यास ८०० वर्षे लागतात--ह्मणजे अर्से ह्मणावें लागतें की ३५ इंच जाडीच्या तारेची २२३ फूट अंतरावरून जितकी जाडी दिसेल तितकें अंतर कमण्यास ह्या तान्यास एक वर्ष लागतें ! ताऱ्यांच्या गतींमुळे आणि आपली पृथ्वीहि शौरीपुंजा- कडल्या आकाशभागाकडे सूर्याबरोबर जात असल्यामुळे उत्त रगोलार्धातील स्वाती, व्हींगा वगैरे तारे आपणांकडे अत्यंत वेगानें येत आहेत, आणि तसेंच दक्षिणगोलार्धांतील क्यास्टर, लुब्धक, मघा वगैरे तारे आपणांपासून दूर जात आहेत असे अनुभवास येतें. लुब्धक ताज्याची गति दररोज सुमारें १ लक्ष मैल जाण्याची आहे. आज निदान चार हजार वर्षे ह्या ताऱ्याचें निरीक्षण मनुष्यप्राण्यांनी चालविलें आहे असें इतिहासलेखां- वरून दिसतें. या चार हजार वर्षीत हा तारा आपणांपासून किती तरी कोटि मैल पूर्वीपेक्षां दूर गेला असेल ! तरी देखील