पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/१८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१२ अंतरिक्षांतील चमत्कार. आणि ज्येष्ठा या नक्षत्रांवर तांबड्या रंगाची झांक मारते. ब्रह्महृदय, प्रोशिअन आणि ध्रुव हे तारे पिंवळे आहेत. आणि क्यास्टर ताज्याचा रंग हिरवागार आहे. . तारायुग्में किंवा जोडतारे अंतरिक्षांत सहस्रावधि आहेत. या प्रकारच्या ताज्यांत बहुतकरून निरनिराळ्या रंगांचे तारे आढळतात; एकीकडे पहावें तो एक तारा हिरवा गार आहे आणि त्याचा सहचारी तारा तांबडा लाल आहे, तर दुसरी- कडे मुख्य तारा नारिंगी रंगाचा असून त्याचा सहचारी निळा आहे अशी जोडी दृष्टीस पडते. एका जोडींत एक शुभ्र पांढरा व दुसरा तांबडा असे तारे आहेत, तर दुसऱ्या जोडींत पांढरा व जांभळा असे तारे आहेत, असे आपण पहातों. दोहोंहून अधिक तारे मिळून जे पुंज झालेले आहेत, त्यांत तर रंगांचें फारच रमणीय वैचित्र्य दृष्टीस पडतें. एक तारा तां- बडा तर दुसरा हिरवा; तिसरा पिंवळा तर चवथा नारिंगी; पांचवा निळा, तर सहावा गुलाबी; याप्रमाणे फार विस्मय- कारक देखावा पाहण्यास सांपडतो. दक्षिणगोलार्धात एक तान्यांचा पुंज आहे त्यांतील सर्व तारे निळ्या रंगाचे आहेत ! याच गोलार्धात दुसरा एक ११० ताऱ्यांचा लहान गुच्छ आहे. त्यांतील मुख्य आठ ताऱ्यांपैकी दोन तारे लाल भडक आहेत, एकाचा रंग निळा असून त्यांत हिरव्या रंगाची झांक मारते, दोन शुद्ध हिरवे आहेत, आणि बाकीचे तीन कांहींसे हिरवे दिसतात. हा गुच्छ दुर्बिणींतून पहात असतां