पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/१८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तारे आपणांपासून किती दूर आहेत. २११ अनुभव घेतल्यावर फिरून या ताऱ्याचा खालच्या प्रतींकडे जाण्याचा क्रम सुरू होतो. याप्रमाणें या ताऱ्याचा क्रम एक- सारखा चालला असतो. हा चमत्कारिक देखावा आपणांस नुसत्या डोळ्यांनींहि दुर्बिणीवांचून दिसूं शकतो. एका महि- न्यांत पौर्णिमेपासून अमावास्येपर्यंत आणि पुनः अमावास्ये- पासून पौर्णिमेपर्यंत जशीं चंद्राचीं स्थित्यंतरें होत असतात, तशींच कांहीं अंशीं या ताज्याचीं स्थित्यंतरें होतात असें ह्मणण्यास हरकत नाहीं. अलगोलसारखें ज्यांचें तेज क्रमानें बदलत जातें असे तेजोविकारी तारे अंतरिक्षांत पुष्कळ आहेत असें समजून आलें आहे. बहुतेक ताऱ्यांचा रंग जरी पांढरा शुभ्र आहे तरी कित्येक तारे निरनिराळ्या रंगांचे आहेत असें दुर्बिणींतून स्पष्ट दिसून येतें. काळोख्या रात्रीं काळ्यानिळ्या आकाशांत असंख्य ताज्यांत कांहीं तांबडे, कांहीं हिरवे, कांहीं पिवळे, कांहीं नारिंगी, कांहीं निळे असे अनेक रंगांचे तारे दुर्बि- णीच्या साह्यानें पाहिल्यावर कोणाच्या मनास आल्हाद वाटणार नाहीं? अशा वेळीं अंतरिक्षाचा देखावा फारच रमणीय वाटतो, आणि विश्वाची रचना केवळ अलौकिक आहे अशी आपली खात्री होते. जे अत्यंत तेजस्वी तारे आहेत त्यांपैकी लुब्धक, अभि- जित्, मघा आणि चित्रा हे तारे पांढरे शुभ्र दिसतात. आर्द्रा आणि रोहिणी हे तारे तांबडे लाल आहेत. स्वाती