पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/१८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१० अंतरिक्षांतील चमत्कार. कित्येक महिने व वर्षेहि लागतात. याप्रमाणें ज्यांच्या तेजांत बदल होत असतो त्यांस तेजोविकारी तारे (Variable Stars) असें ह्मणतात. कांहीं तारे एकदां दृष्टीस पडून जे नाहींसे होतात ते पुनः दृष्टीस पडत नाहींत. कित्येक तारे पूर्वी दिसत होते, ते आज मुळींच दिसत नाहींत. आणि आजपर्यंत दिसत नव्हते असे कांहीं नवीन तारे दिसूं लागले आहेत. याप्रमाणें ताऱ्यांचा मोठा विलक्षण चमत्कार आहे ! ययातितारापुंजांत जो अलगोल (Algol) नांवाचा तारा आहे त्याचें तेज अगदीं क्रमानें कमी कमी होत जातें, आणि पुनः क्रमानें अधिक अधिक होत येतें. हा तारा दुसऱ्या प्रतीचा आहे असें धरितात. परंतु सुमारें तीन दिव- सांच्या अवकाशांत हा दुसऱ्या प्रतीपासून चवथ्या प्रतीपर्यंत जाऊन, पुनः क्रमानें आपल्या मूळच्या दुसऱ्या प्रतीवर येऊन ठेपतो. या ताऱ्याचें तेज बदलत जातें तें असें: दुसऱ्या प्रतींतील ताऱ्यांप्रमाणें चमकत असतांना एकदम ह्याचें तेज कमी कमी होत जातें; तें इतकें कीं, तीन चार तासांत हा चवथ्या प्रतीच्या ताज्यांप्रमाणे दिसूं लागतो. या स्थितींत सुमारें २० मिनिटें राहून हा फिरून हळू हळू तेजस्वी होत जातो, आणि तीन चार तासांत हा पुनः पूर्वीप्रमाणे दुसऱ्या प्रतीच्या ताज्याप्रमाणें चमकूं लागतो. सुमारें २ दिवस आणि १३ तास इतका वेळ दुसऱ्या वर्गातील स्थितीचा