पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/१८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तारे आपणांपासून किती दूर आहेत. २०९ आणि ज्या स्वरमंडळपुंजांतील क तान्यास आपण अभि जित् ह्मणतों, त्यास तिकडील लोक व्हीगा ( Vega ) ह्मणतात. आकाशांत पहिल्या प्रतीचे तारे सारे १९ आहेत. लुब्ध- काचा तारा (Sirius), मृगपुंजांतील आर्द्रा (Betelgeuze), वृषभराशींतील रोहिणी ( Aldebaran ), वृश्चिकांतील ज्येष्ठा ( Antares ), कन्येंतील चित्रा ( Spica ), आणि नौकापुंजांतील अगस्त्य (Canopus ) हे तारे पहिल्या प्रतीपैकीं आहेत. दुसऱ्या प्रतींत सुमारें १९ तारे येतात. सप्तर्षीच्या सात ताऱ्यांपैकी जे २।३ तारे अमळ ठळक दिसतांत ते दुसऱ्या प्रतीच्या ताज्यांपैकी आहेत. तिसऱ्या प्रतींत सुमारें १८२ तारे आहेत. चवथ्या प्रतीत ५३०, पांचवींत १६००, सहावींत ४८००, सातवींत १५०००, आठवींत ४५ हजार आणि नववींत १ लक्ष ४२ हजार तारे आहेत असा अजमास केला आहे. याप्रमाणें जसजसें आपण खालच्या प्रतींकडे जावें, तसतसा तान्यांचा समुदाय अधिकाधिक होत गेला आहे असें अनुभवास येतें. वर सांगितल्याप्रमाणें ताऱ्यांचे जरी निरनिराळे वर्ग किंवा प्रति केल्या आहेत तरी कांहीं तारे असे चमत्कारिक आहेत कीं, त्यांचें तेज वारंवार अगदीं नियमितपणानें बदलत असतें. कांहींचें तेज एक दोन दिवसांच्या अवकाशांत कमी अधिक होतें आणि कांहींचें तेज कमी अधिक होण्यास १४