पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/१८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०८ अंतरिक्षांतील चमत्कार. - आहे असें दिसून येतें. असे पुंज अंतरिक्षांत सहस्रावधि आहेत. एका पुंजांत निरनिराळ्या प्रतींचेहि तारे असतात. एका पुंजांतील निरनिराळे तारे ओळखण्यास सुलभ जावें ह्मणून त्यांस ग्रीक भाषेतील आल्फा ( Alpha ), बीटा ( Beta ), थीटा ( Theta ) इत्यादि मूलाक्षरांचीं नांवें दे- ण्याची चाल युरोपखंडांत पडली आहे; जसें, सेंटार ( Centaur ) — नरतुरंग - नांवाचा जो ताऱ्यांचा पुंज दक्षिण गोलार्धांत दिसतो, त्या पुंजांतील ताऱ्यांस आल्फा सेंटारी ( Alpha Centauri ), बीटा सेंटारी (Beta Centauri ) अशीं निरनिराळी नांवें तिकडील लोक देतात. • आपल्या इकडे आपल्या भाषेतील मूलाक्षरांची नांवें देण्याची चाल पडली आहे. ह्मणून नरतुरंग पुंजांतील पहिल्या ता- प्यास – ह्मणजे ज्यास तिकडील लोक आल्फा सेंटारी ह्मण- • तात त्यास आपण नरतुरंगांतील क ' असें ह्मणतों. कांहीं लोक मूलाक्षरांची नांवें न देतां आंकड्यांवरूनच ता- ज्यांस नांवें देतात; जसें नरतुरंगांतील १, नरतुरंगांतील २ असें ह्मणतात. कित्येक पुंजांतील कांहीं कांहीं ठळक ताऱ्यांस स्वतंत्र नांवें प्राचीन काळापासून पडलेली आहेत. सिंह रा शींतील क तान्यास आपले लोक मघा ह्मणतात, आणि युरोपांतील लोक रेग्युलस (Regulus) ह्मणतात. ज्या सारथि पुंजांतील क ताऱ्यास आपण ब्रह्महृदय ह्मणतों, त्यास तिकडील लोक क्यापेला ( Capella ) ह्मणतात, 6