पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/१८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तारे आपणांपासून किती दूर आहेत. २०७ ४. ताऱ्यांचें तेज आणि तान्यांचे रंग. नुसत्या डोळ्यांनी पाहिले असतांहि सर्व ताऱ्यांचें तेज सारखें दिसत नाहीं, कमी अधिक दिसतें. कांहीं तारे तेजस्वी, कांहीं अंधुक, आणि कांहीं अगदींच अंधुक आहेत असें आपण पहातों. तारे ओळखण्यास सोपें पडावें ह्मणून त्यांच्या तेजावरून ताऱ्यांच्या निरनिराळ्या प्रति केल्या आहेत. जे सर्वांत तेजस्वी तारे ते पहिल्या प्रतीचे होत; जे त्यांच्याहून कमी तेजस्वी ते दुसऱ्या प्रतीचे होत; जे त्यांच्याहूनहि कमी तेजस्वी ते तिसऱ्या प्रतीचे. याप्रमाणें नुसत्या डोळ्यांनीं दिसणाऱ्या ताऱ्यांच्या ६ प्रति करितात. ह्मणजे ६ प्रतींपर्यंत तारे आपणांस दुर्बिणीवांचून दिसतात असे आपणांस ह्मणतां येईल. या प्रतीखालचे तारे दुर्बिणीवांचून दिसत नाहींत. मोठ्या दुर्बिणींतून १८१९ प्रतींपर्यंत तारे दृष्टीस पडूं शकतात ! जे तारे आपणांस अत्यंत तेजस्वी दिसतात ते अंधुक ताऱ्यांपेक्षा मोठे आहेत असें ह्मणतां येत नाहीं. कारण कीं, एखादा तारा लहान असून आपणांस जवळ असल्यामुळे तेजस्वी दिसत असेल; आणि एखादा तारा मोठा असूनहि फार दूर असल्यामुळे अंधक दिसत असेल. तेव्हां ताज्यांच्या तेजावरून त्यांच्या आकारमानाची कल्पना करणें बरोबर होणार नाहीं. O कित्येक तारे एकत्र जमून त्यांचा एक पुंज झालेला