पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/१८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०६ अंतरिक्षांतील चमत्कार. मच्या एका वाचकाची स्वारी प्रवास करण्यास निघाली अशी कल्पना करूं. आतां हें उघड आहे कीं ही रक्कम त्यास खि- शांत घालून नेतां येणार नाही. ही रक्कम नेण्यास गाड्या किती लागतील? दहा, वीस, पन्नास सुद्धां गाड्या पुरणार नाहींत. निदान ११६ शें गाड्या ८० कोटि रुपये स्टेशनापर्यंत नेण्यास लागणार ! बरें इतकेंहि करून ही स्वारी स्टेशनावर येऊन दाखल झाली; आणि स्टेशन मास्तरास ह्मणाली कीं, “आह्मास मुंबईपासून आल्फा सेंटारीचें टिकीट द्या. भाड्याची रक्कम गाड्या भरून आणली आहे. भाडें पडत असेल तें घेऊन बाकीची रक्कम परत द्यावी !" तर, या रकमेंतून भाडें जाऊन एक छदाम तरी विचान्यास परत मिळेल काय? सर्व रक्कम मोजल्यावर स्टेशन मास्तर सांगेल कीं, "अहो, एवढीचशी रक्कम कशी पुरेल? एका टिकिटाचें भाडें १०० मैलांस एक आणा याप्रमाणे १९६२३ कोटि रुपये होतात. आणि तुझी तर सारे ८० कोटि रुपये घेऊन आला आहांत!” ही गोष्ट अत्यंत जवळच्या ताज्याविषयीं झाली, मग, जे तारे यापेक्षांहि शंभरपट, हजारपट, लक्षपट दूर असतील त्यांच्या अंतरांची बरोबर कल्पना कशी व्हावी ? यावरून, विश्वाचा विस्तार केवढा अमर्यादित आहे आणि एकंदर वि- श्वाची रचना किती विस्मयकारक आहे याविषयीं साधारण अनुमान आतां आपणांस करितां येईल.