पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/१८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तारे आपणांपासून किती दूर आहेत. २०५ आपणांस पाहण्यास सांपडून किती बरें मौज वाटेल ! आणि इतिहासदृष्ट्या केवढा लाभ होईल ! - ताज्यांचीं अंतरें समजणें इतकें चित्तवेधक आहे कीं, त्यांविषयीं आणखी एका दृष्टीनें विचार केल्यावांचून आमच्या- नें राहवत नाहीं. आपण अशी कल्पना करूं कीं, मुंब- ईपासून नरतुरंगांतील क - पूर्वी सांगितलेल्या सर्वांत अत्यंत जवळच्या-ताऱ्यापर्यंत जाण्याकरितां आगगाडीचा रस्ता तयार केला आहे. हा रस्ता २५ लक्षकोटि मैल लांब होईल हें उघड आहे. हा आगगाडीचा प्रवास करावयास -ह्मणजे मुंबई- पासून त्या ताऱ्यापर्यंत आपणांस किती भाडें पडेल तें पाहूं. मुंबईपासून पुण्यापर्यंत दरमैलास २॥ पैप्रमाणे येथील रेलवे कंपनी १॥ रुपया भाडें घेते हें सर्वास माहीत आहेच. आकाशांतील रेलवे कंपनी यापेक्षां फारच थोडें भाडें घेते असें समजूं. या कंपनीनें दर १०० मैलांस फक्त एक आणा भाडें घेण्याचा ठराव केला आहे असें धरिलें, तर सुमारें पांच पैशांत पुण्यापासून मुंबईपर्यंत जातां येईल. इतकें स्वस्त भाडें पाहून आमच्या वाचकांपैकीं पुष्कळ मंडळी त्या ताज्याकडे जाण्यास उत्सुक होतील यांत संशय नाहीं. पण १०० मैलांस फक्त एकच आणा हा जरी भाड्याचा दर असला, तरी मुंबई- पासून त्या ताज्यापर्यंत किती रुपये भाडें पडेल याचा कांहीं सुमार आहे का? हिंदुस्थानचें एका वर्षाचें सरकारी उत्पन्न ७१।८० कोटि रुपये आहे. एवढी रक्कम बरोबर घेऊन आ