पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/१७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०४ अंतरिक्षांतील चमत्कार. दूरच्या ताऱ्यांवरील लोकांस आज दृष्टीस पडून त्यांना प्राचीनकाळच्या ग्रीस देशांतील थर्मापिलीच्या प्रसिद्ध लिआनिडासाचें स्मरण खचीत होत असेल. सर्व महाराष्ट्रीयांस सदैव वंद्य अशा श्रीशिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा समारंभ यांपलीकडच्या ताऱ्यांवरील लोकांस आज दृष्टीस पडत असेल. यांपेक्षां दूरच्या ताऱ्यांांवरील लोकांस आज असें पाहण्यास मिळेल कीं, परधर्मी असूनहि हिंदूचें पितृवत् पालन करणारा जो अकबर बादशाहा तो दिल्लीस राज्य करीत आहे. यांपलीकडेहि जे तारे आहेत त्यांवर सज्जनांचा आश्रयदाता जो पराक्रमी विक्रम त्याच्या कारकीर्दीची बातमी प्रकाशानें आतांच नेऊन पोंचविली असेल. यांहूनहि दूर जे तारे असतील त्यांवरील लोक कौरव पांडवांचें कुरुक्षेत्रावर चाललेलें तुमुल युद्ध आज या घटकेला पहात असतील. यांपलीकडील ताज्यांवरील लोकांस रामराजा राव णाचे शासनार्थ सेतु उतरून स्वारी करीत आहे असे दिसत असेल. यांपेक्षांहि जे तारे दूर आहेत त्यांवरून या क्षणीं वेद- काळच्या ऋषींचीं होमहवनें चालली आहेत असे पाहण्यास सांपडेल. सारांश, जर अंतरिक्षांत दूर दूर वसलेल्या ता-यां- वरून पृथ्वी दिसूं शकेल, आणि जर आपणांस या ताऱ्याव- रून त्या ताऱ्यावर याप्रमाणें अंतरालांत चोहोंकडे निमिषार्धीत उड्डाण करितां येईल, तर या देशाचीं जीं स्थित्यंतरें अगदीं आरंभापासून होत गेलीं आहेत, त्यांचें वास्तविक स्वरूप