पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/१७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तारे आपणांपासून किती दूर आहेत. २०३ कांहीं तारे आपणांपासून अशा अंतरावर आहेत कीं, त्यांवरून जर आपला हिंदुस्थान देश दिसूं शकेल तर तेथील लोकांस आज असें दिसून येईल कीं, मुंबईस सन १८८९ श्री राष्ट्रीय सभा भरली आहे आणि तेथें एका लोकोत्तर पुण्यपु- रुषाच्या - ब्रॉडला साहेबाच्या दर्शनाकरितां हजारों लोक जमले आहेत ! कांकीं, या दिवशीं सहा वर्षांपूर्वी येथून जो प्रकाश निघाला तो आज रोजी त्या ताऱ्यांवर जाऊन पोंचाव- याचा. या ताऱ्यांपलीकडे दूर जे तारे आहेत, तेथील लोकांस आज असें नजरेस पडेल कीं, हिंदुस्थानांतल्याच नव्हे तर साया दुनियेतल्या एका अद्वितीय स्त्रीरत्नानें-झांशीच्या राणी लक्ष्मीबाई हिनें-आपल्या अलौकिक धैर्यशौर्यादि गुणांनीं मोठमोठ्या इंग्लिश वीरांसहि चकित करून सोडिलें आहे. यांहूनहि पलीकडे जे तारे असतील, त्यांवरील लोकांस आज असें पाहण्यास सांपडत असेल कीं, इंग्लिश सैन्याचा वडगांव मुक्कामीं पराभव करणारें महादजी शिंद्याचें सैन्य मोठ्या विजयघोषानें पुणे शहरांत परत येत आहे! यांपलीकडच्या ताऱ्यांवरील लोक असें पहात असतील कीं, एकीकडे थोरला बंधु ( पहिला बाजीराव ) दिल्लीवर स्वारी करीत आहे, तर दुसरीकडे धाकटा बंधु ( चिमाजी आप्पा ) वसईचा दुर्घट किल्ला पोर्चुगीज लोकांपासून हस्तगत करून त्यावर भगवा झेंडा रोवीत आहे. बाजी देशपांडे याचा कोल्हापुराजवळ पावनखिंडीतला सतराव्या शतकांतला अद्भुत पराक्रम यांहूनहि