पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/१७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०२ अंतरिक्षांतील चमत्कार: विचार केला. पण यापेक्षांहि पराकाष्ठेचे दूर असे तारे अनंत आहेत. ही गोष्ट लक्षांत आणिली असतां मनांत नानाप्रकारचे चमत्कारिक विचार येतात, आणि अंतरिक्षस्थ जड पदार्थांचें अवलोकन फारच चित्तवेधक वाटतें. ध्रुवाचा तारा इतका दूर आहे की ज्या प्रकाशामुळें तो आपणांस आज दिसतो, तो प्रकाश ह्या ताऱ्यावरून आमच्या पुष्कळ वाचकांच्या जन्मा- पूर्वी निघाला आहे! कारण ध्रुवाचा प्रकाश पृथ्वीवर येण्यास ३६ वर्षे लागतात! दुर्बिणींतून जे अनेक तारे आपण पहातों, त्यांपैकीं कित्येकांवरील प्रकाश पृथ्वीवर येऊन पोंचण्यास सहस्रावधि, किंबहुना लक्षावधिहि वर्षे लागतात. तेव्हां, आज जे तारे आपण पाहतों, ते आज जसे असतील तसे अर्थात् दिसावयाचे नाहींत, तर ते कित्येक युगांपूर्वी जसे होते तसे दिसतील. सारांश, जरी एखादा तारा आज सहस्रावधि वर्षे थंडगार निस्तेज होऊन गेला असला, तरी तो अजून दररोज रात्रीं अंतरिक्षांत तसाच चमकतांना आपल्या दृष्टीस पडणारच ! ताऱ्यांच्या प्रचंड अंतराची कल्पना पूर्णपणे मनांत बिंब- ण्यास आपण आणखी एका तऱ्हेनें विचार करूं. अशी कल्पना करा कीं, ताऱ्यांवर ज्योतिषी आहेत आणि त्यांना आपली पृथ्वी दिसेल एवढ्या मोठ्या दुर्बिणी त्यांच्याजवळ आहेत, तर त्यांना आपली पृथ्वी कशी दिसेल बरें ? आज ज्या स्थितींत पृथ्वी आहे त्या स्थितींत अर्थात् दिसावयाची नाहीं, तर कित्येक वर्षांपूर्वी ती जशी होती तशी त्यांच्या दृष्टीस पडेल !