पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/१७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

are तारे आपणांपासून किती दूर आहेत. २०१ लागतात. या मानानें पाहतां सर्वांत अत्यंत जवळच्या ह्मणजे नरतुरंगपुंजांतील क या ताऱ्यावरील प्रकाश आपल्या येथें येऊन पोंचण्यास सुमारें ४ वर्षे ४ महिने लागतील. या गोष्टीचा परिणाम काय होतो तो लक्षांत आणावा, ह्मणजे या ताज्याच्या अंतराची कांहींशी कल्पना होईल. ज्या घटकेला आपण या ताऱ्याकडे पाहतों, त्या वेळीं तो तारा त्या घटकेस ज्या स्थितींत असतो त्याप्रमाणे आपणांस दिसत नाहीं; तर सुमारें चार वर्षांपूर्वी ज्या स्थितींत होता त्याप्रमाणे दिसतो. कां कीं ज्या प्रकाशाच्या योगानें आपणांस त्या ताऱ्याचें दर्शन - या घटकेस होतें, तो प्रका त्यावरून सुमारें चार वर्षांपूर्वी निघाला होता, आणि तो हा काळपर्यंत वाट चालत होता. खरोखर प्रकाश आपल्याकडून फार जलदीनें जात असतो. दर सेकंडांत १ लक्ष ८६ हजार मैल जाण्याची शक्ति असू- नहि त्यास ४ वर्षे ४ महिने सारखें चालावें लागतें. कारण, त्यास पृथ्वी पर्यंत येण्यास २५ लक्षकोटि मैलांचा प्रवास करावयाचा असतो! जरी कांहीं कारणामुळे हा तारा विश्वांतून या क्षणींच नाहींसा झाला, तरी तो पुढें चार सव्वाचार वर्षे - पर्यंत, आकाशांत चमकतांना आपल्या दृष्टीस पडत जाईल. तेव्हां, आज रात्रीं जे कोट्यावधि तारे आपण आकाशांत पाहूं, ते आज जसे तेथें असतील, तसे दिसावयाचे नाहींत; तर, ते कित्येक वर्षांपूर्वी जसे होते तसे दिसतील! इतक्या वेळपर्यंत आपण अत्यंत जवळच्या ताज्याविषयीं