पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/१७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०० अंतरिक्षांतील चमत्कार. - लागेल बरें ? दर सेकंडास एक आंकडा मोजावयाचा – या मानानें एका दिवसांत ८६ हजार ४ शें इतके आंकडे मोजिले जातील; आणि एक कोटि आंकडे मोजण्यास ११५ दिवस लागतील! या मानानें २५ लक्षकोटि आंकडे मोजण्यास ७ लक्ष वर्षांहूनहि अधिक वर्षे लागणार! असला प्रयत्न कोणांच्याहि हातून होणार नाहीं हैं उघड आहे. मनुष्यप्राण्याचें फार झालें तर १०० | १२५ वर्षांचें आयुष्य कोणीकडे, आणि जें काम पुरे होण्यास सात आठ लक्ष वर्षे लागणार तें कोणीकडे! तेव्हां असल्या भरीस न पडतां अंतरांविषयीं आपण निराळ्याच तऱ्हेनें विचार करूं. आपल्या सूर्यमालेतील सर्वांत शेवटला ग्रह जो नेप्च्यून, तो सूर्यापासून ३०० कोटि मैल दूर आहे. आतां सूर्यापासून नेप् च्यूनपर्यंत जिचा विस्तार आहे अशा आपल्या सूर्यमालेसारख्या पुष्कळ सूर्यमाला घेऊन त्यांची जर एक रांग या जवळच्या तान्यापर्यंत लाविली, तर आपल्या सूर्यमालेसारख्या ८३३३ माला एकीपुढें एक अशा ओळीनें लावाव्या लागतील ! किंवा, सूर्यापासून जवळच्या ताऱ्यापर्यंत एक पूल करावयाचा असें मनांत आणिलें, तर सूर्यापासून पृथ्वीइतक्या लांबीची ह्मणजे सुमारें १० कोटि मैल लांबीची एक एक कमान अशा एकंदर अडीच लक्ष कमानी लावाव्या लागतील ! प्रकाश एका सेकंडांत १ लक्ष ८६ हजार मैल जातो. सूर्य आपणांपासून ९ कोटि ३० लक्ष मैल दूर असल्यामुळे त्यावरील प्रकाश पृथ्वीवर येऊन पोंचण्यास ८८३ मिनिटें