पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/१७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तारे आपणांपासून किती दूर आहेत. १९९ नवीन तारे आपणांस समजून येतात. यावरून तारे असंख्य आहेत इतकें मात्र उघड होतें. ३ तारे आपणांपासून किती दूर आहेत ? आतां ताऱ्यांच्या अंतरांविषयीं थोडासा विचार करूं. सूर्य आपणांपासून ९ कोटि ३० लक्ष मैल दूर आहे हें पूर्वी सांगितलें आहेच. या मानानें जर पाहिलें तर सर्वांत अत्यंत जवळचे जे तारे आहेत, त्यांचीं सुद्धां अंतरें सूर्याच्या अंतरा- पेक्षांहि शेंकडों— हजारों-पट अधिक आहेत असें ह्मटले पाहिजे. आपणांस सर्व ताऱ्यांत, अत्यंत जवळचा तारा ह्मटला ह्मणजे 'आल्फा सेंटॉरी' (Alpha Centauri)– 'नरतुरंगपुंजांतील क' – या नांवाचा तारा होय. हा तारा आपणांपासून २५ लक्षकोटि (२५ महापद्म) मैल दूर आहे! पंचवीसाचा आंकडा लिहून त्यावर १२ पूज्ये दिलीं ह्मणजे २५ लक्षकोटि ही संख्या होते. याप्रमाणें ही संख्या उच्चारण्यास किंवा लिहिण्यास सोपें हें खरें. पण या संख्येनें केवढें भयंकर अंतर दर्शित केलें जातें याची कल्पना करणे कठीण! ह्मणून या अंतराची वास्तविक कल्पना मनांत भरण्यास कांहीं तरी उदाहरणांनीं स्पष्टता केली पाहिजे. एक, दोन, तीन, याप्रमाणें या अंतरा- इतके - २५ लक्षकोटि— आंकडे एकसारखे मध्ये न थांबतां मोजण्याचा प्रयत्न केल्यास आपणांस किती वेळ