पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/१७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९८ अंतरिक्षांतील चमत्कार. त्राच्या साहाय्याने अद्याप मानवी दृष्टीस झालें नाहीं, अशा ताऱ्यांचें अस्तित्व आपणांस फोटोग्राफाच्या योगानें कळून येतें ! या ताज्यांपासून येणारा प्रकाश अत्यंत सूक्ष्म असल्या- मुळे हे आपणांस मोठमोठ्या दुर्बिणींतून देखील दिसत नाहींत. दुर्बिणींत ठेवलेल्या फोटोग्राफाचे कांचेवर सुद्धां यांपैकीं कित्येक ताज्यांच्या प्रतिमा फारच अंधक उठतात. ह्मणून त्या स्पष्ट समजण्याजोग्या उठण्याकरितां आंत कांच ठेवलेली दुर्बीण आकाशांतील भागाकडे पांच पांच सहा सहा तासपर्यंत देखील • लावून ठेवावी लागते ! यावरून अंतरिक्षांतील अनंत गोलांची रचना, कशा विलक्षण व विस्मयकारक तऱ्हेनें झालेली आहे याची बरीचशी कल्पना करितां येईल. आतां अंतरिक्षांतील सर्वच ताऱ्यांच्या प्रतिमा फोटोग्राफच्या कांचेवर उठत असतील, आणि त्यावरून विश्वांतील एकून एक तारा आपणांस कळून आला आहे असें नाहीं. असे अनंत तारे असले पाहिजेत कीं, ते अमर्याद अंतरावर दूर असल्यामुळे फोटोग्राफच्या कांचेवर त्यांच्या प्रतिमा निघण्यापुरताहि प्रकाश आपल्या पृथ्वीवर येऊन पोंचत नाहीं. तेव्हां असले तारे मनुष्यास अद्यापपर्यंत तरी अज्ञात असे राहिलेले आहेत ! जों जो मोठमोठ्या शक्तीच्या दुर्बिणी निघतात, जो जो फोटोग्राफच्या उत्तम उत्तम कांचा तयार होतात, आणि जों जों या कांचा अधिक अधिक .वेळपर्यंत दुर्बिणींत ठेवितां येतात, तों तों कोट्यावधि नवीन