पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/१७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तारे किती आहेत. १९७ डोळ्यांनी दिसणारे ६ हजार तारे कोणीकडे, आणि मोठ्या दुर्बिणींतून दिसणारे ५ कोटि तारे कोणीकडे ! बरें इतक्यानें तरी आकाशांतील तारे संपले असें म्हणता येईल काय? मुळींच नाहीं. मोठ्या दुर्बिणींतून दिसणाऱ्या ताज्यांपेक्षांहि कोट्या- वधि तारे अंतरिक्षांत आहेत. आतां लोक ह्मणतील कीं, मोठ्या दुर्बिणींतून जे तारे दिसत नाहींत ते आहेत असें ह्मणावें तरी कसें? आणि, ह्मटलें असतां खरें तरी कसें मानावें? शंका योग्य आहे. पण या ताऱ्यांचें अस्तित्व आपणांस एका विलक्षण तऱ्हेनें खात्रीपूर्वक कळून आले आहे. अंतरिक्षांतील चमत्कारांचे फोटोग्राफ काढण्याची युक्ति नुकतीच निघाली आहे. ज्या कांचे- वर फोटोग्राफ घेतात अशी कांच दुर्बिणींत लावावयाची, आणि नंतर दुर्बीण आकाशांतील एखाद्या भागाकडे लावून ठेवायची. एक दोन तासांनीं कांच काढून पाहिली ह्मणजे त्या कांचे- वर लक्षावधि ताऱ्यांनीं आपआपल्या तसविरा काढून ठेविल्या आहेत असें आढळून येतें ! त्यांपैकीं जे ठळक तारे आहेत. ते दुर्बिणींतून दिसतात. परंतु दुर्बिणींतून सुद्धां ज्यांचें दर्शन- मनुष्यास झाले नाहीं, अशा हजारों ताऱ्यांच्या प्रतिमा कांचेवर मात्र स्पष्ट उठलेल्या पाहण्यास सांपडतात ! ताऱ्यांचे फोटोग्राफ घेण्याचीं यंत्रें निराळींच असतात, आणि ताहि निराळी असते. त्याविषयीं येथें विशेष लिहिण्याची आ वश्यकता नाहीं. येथें सांगण्याची मुख्य गोष्ट ही आहे कीं, ज्या कित्येक ताऱ्यांचें दर्शन कोणत्याहि इतर यं-