पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/१६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तारे. आहेत, आणि ग्रह हे केवळ दगडांप्रमाणे निस्तेज जड पदार्थ आहेत असें खात्रीपूर्वक समजून आलें आहे ! आतां जे तेजाचे अगणित बिंदु आपण रोज रात्रीं पाहतों, ते जरी सूर्य आहेत, तरी त्यांच्याभोंवतींहि फिरणाऱ्या ग्रहमाला आहेत असे आपण कां ठरवितों व त्या ग्रहमाला आपणांस कां दिसत नाहींत हे पाहूं. रात्रीच्या समयीं जर कोणी मनुष्य एखाद्या अति उंच जागेवरून मुंबई शहराचा देखावा पाहील, तर त्यास काय काय दिसेल बरें ? बंदरांतील मोठमोठ्या नावा, शहरांतील रुंद रस्ते, बोरीबंदरचें अफाट स्टेशन, कुलाब्याची उंच दांडी, विस्तीर्ण टॉउनहॉल इत्यादि त्याच्या दृष्टीस पडतील काय? अर्थात् रात्रीच्या अंधारामुळे हीं त्यास मुळींच दिसणार नाहींत. परंतु शहरांतील हजारों दिवे मात्र जागजागीं लकाकतांना त्यास दिसून येतील; दुसरें कांहींएक दिसणार नाहीं. परंतु हे दिवे पाहून त्यास खचित वाटेल कीं, बंदरांत जेथें जाणाऱ्या येणाऱ्या नावांची गर्दी उडाली आहे तेथील यांपैकीं कांहीं दिवे असतील, कांहीं दिवे रस्त्यांतील म्युनिसिपालिटीचे धुराचे व विजेचे अस- तील, कांहीं दिवे स्टेशनांत येणाऱ्या जाणाऱ्या आगगाडीं- तील असतील, आणि कांहीं दिवे टॉउनहॉलमध्ये एखाद्या प्रसिद्ध वक्त्याचें सुंदर भाषण चाललें असेल तेथें लावलेले असतील ! याप्रमाणें तो मनुष्य अनुमान करील. पण त्यास त्या उंच स्थानावरून जागोजागच्या दिव्यांच्या उजेडापेक्षां १३