पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/१६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९४ अंतरिक्षांतील चमत्कार. दुसरें प्रत्यक्ष कांहींएक तरी दिसेल काय ? याचप्रमाणें जेव्हां आपण तारामय आकाशाकडे पाहतों, तेव्हां आपणांस तेजाचे लकलकणारे बिंदु मात्र दिसतात, दुसरें कांहीं- एक दिसत नाहीं. पण या तेजाच्या बिंदूंभोंवतीं-ताज्यां- भोंवतीं-फिरणाऱ्या ग्रहमाला असतील, शेंडेनक्षत्रे असतील, तेथें प्राण्यांची वसतीहि असेल इत्यादि तर्क केल्यावांचून आपलें मन कसें राहील ? आपल्या येथें सूर्यमालेमध्यें सूर्य हा तारा मध्यभागी असून त्यापासून उष्णता व उजेड पृथ्वी इत्यादि ग्रहांस मिळतात; आणि येथें पृथ्वीवर सर्व कांहीं व्यवहार चालत आहेत ! मग अनंत ताज्यांभोवती फिरणाऱ्या सुंदर ग्रहमाला असतील वगैरे कल्पना करण्यास काय हरकत आहे? आणि एक वेळ अशा कल्पना मनांत भरल्या, कीं त्यांमागून दुसरे तर्क आलेच. समुद्र, नद्या, पर्वत, शहरें, खेडीं हीं तेथील ग्रहांवर असावयाचींच; चमत्कारिक वनस्पति आणि नानाप्र- कारचे प्राणी तेथें असतीलच; मनुष्यासारखे बुद्धिवान् व कल्पक लोकांची वसति तेथें असून ते लोक आपल्याप्रमाणें विश्व - चमत्कार पाहून आणि त्यांविषयीं विचार करून थक्क होत असतील — अशा अनेक कल्पनातरंगांनी आपले मन उचंबळून जातें ! आणि जें विश्व आपणांस दिसतें, त्यापेक्षां जें दिसत नाहीं तें विश्व केवढें अनंत आहे व किती अद्भुत आहे, हें मनांत येऊन आपण चकित होऊन जातों ! दूर अंतरालांत असलेल्या जड पदार्थांपैकीं जितकें ह्मणून