पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/१६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९२ अंतरिक्षांतील चमत्कार. मारिली, तर जसजसा तो अंतरिक्षांत दूर जात जाईल तस- तशी पृथ्वी आणि इतर ग्रह हीं दिसेनाशीं होतील. आणखी दूर गेल्यास सूर्याचें तेज कमी कमी होत चालले आहे असें त्यास दिसून येईल. आणि ताऱ्यांच्या अंतराइतकें दूर गेल्यावर तर सूर्य हा केवळ एखाद्या अंधुक तान्याप्रमाणे आकाशांत च- मकत आहे असें त्यास आढळून येईल! यास्तव अमर्याद अंत- रिक्षसमुद्रांत आपली माला एक लहानसें बेट आहे असें ह्मटलें असतां शोभेल ! ज्याप्रमाणें युरोप व अमेरिका या खंडांच्या किनाऱ्यांपासून एखादा लहानसा खडक पासिफिक महासा- गरांत अलग दिसण्यांत येतो, त्याप्रमाणे आपली सूर्यमाला अंतरिक्षसमुद्रांत दुसऱ्या मालांपासून तुटक अशी आहे. तारे जे आहेत, ते आपल्या स्वतःच्या प्रकाशानें लकाक- तात हे ध्यानांत ठेवणें फार अवश्य आहे. रोहिणीचा तारा मंगळाप्रमाणें चमकतो; पण मंगळ यास स्वतःचा प्रकाश नाहीं हें मांगें सांगितलेच आहे. पुष्कळ वेळां ग्रह यांस लोक चुकीनें तारे समजतात, आणि ताऱ्यांस ग्रह समजतात. यास्तव ग्रह व तारे यांविषयीं भेद चांगला लक्षांत ठेविला पाहिजे. जरी रोहिणीचा तारा मंगळासारखा दिसतो, तरी हा तारा मंगळापेक्षां आकारानें कदाचित् लक्षावधिपट मोठा येईल, आणि अंतरानें तर तो लक्षावधिपट दूर आहेच ! तारे आपणांस फार दूर आणि ग्रह आपणांस फार जवळ, इतकाच भेद तारे आणि ग्रह यांमध्ये आहे असें नाहीं. तर तारे हे प्रतिसूर्य